Naisargik Adhivasacha Abhyas karun vanaspati aani Pranyanvishayi Mahiti Milva aani Kontyahi 10 Prajatinchi Mahiti Liha. | Paryavar Jalsuraksha Prakalp | Educational Marathi
प्रश्न :
       तुमच्या
सभोवतालच्या, नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करून वनस्पती आणि
प्राण्यांविषयी माहिती मिळवा आणि कोणत्याही १० प्रजातींची माहिती लिहा.
प्रकल्प प्रस्तावना
निसर्ग
हा मानवाचा खरा गुरु, मित्र आणि आधार आहे. आपण ज्या वातावरणात
राहतो, त्यात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी जगतात.
प्रत्येक वनस्पती व प्राणी हे स्वतःच्या वेगवेगळ्या अधिवासात राहतात. जसे की झाडे
जंगलात, शेतात, अंगणात, तर प्राणी काही पाण्यात, काही जमिनीवर,तर काही प्राणी दोन्ही ठिकाणी राहतात. या सर्व जीवांचे अस्तित्व एकमेकांवर
अवलंबून असते आणि त्यातूनच निसर्गातील संतुलन टिकून राहते.
आपल्या
सभोवतालची जैवविविधता म्हणजेच विविध प्रकारचे सजीव . ते फक्त निसर्गाचे सौंदर्य
वाढवत नाहीत तर त्यांच्यापासून मानवाला फायदा ही होतो. उदाहरणार्थ, झाडे आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात,
औषधे देतात. प्राणी शेतीसाठी, अन्नासाठी,
तसेच परिसंस्थेतील समतोल राखण्यासाठी मदत करतात.
आज
औद्योगिक आणि यंत्राच्या युगात मानवाची निसर्गाशी नाळ तुटत चालली आहे. जंगलतोड, प्रदूषण, शहरीकरण यामुळे अनेक जीवजाती धोक्यात आल्या
आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शालेय वायापासून निसर्ग निरीक्षण करणे, त्यातील विविध प्रजातींचा अभ्यास करणे, आणि त्यांचे
महत्त्व ओळखणे खूप गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मी माझ्या सभोवतालच्या नैसर्गिक
अधिवासाचा अभ्यास करून वनस्पती आणि प्राण्यांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला
आहे. या प्रकल्पात मी १० प्रजातींची निवड केली आहे – ५ वनस्पती व ५ प्राणी.
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf
project पर्यावरण प्रकल्प pdf
educational marathi
प्रकल्प अनुक्रमणिका  
| अ.क्र. | घटक | 
| १) | प्रकल्पाची उद्दिष्टे | 
| २) | विषयाचे महत्व | 
| ३) | प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती | 
| ४) | निरीक्षणे | 
| ६) | विश्लेषण | 
| ८) | निष्कर्ष | 
| ९) | संदर्भ | 
| १०) | अहवाल | 
प्रकल्प उद्दिष्ट्ये
Ø    आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास
करणे.
Ø    विविध वनस्पती व प्राणी ओळखून त्यांची नावे व
वैशिष्ट्ये जाणून घेणे.
Ø    प्रत्येक प्रजातीचे पर्यावरणातील महत्त्व समजून
घेणे.
Ø    स्थानिक जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे.
Ø    वनस्पती व प्राणी यांच्यातील परस्परसंबंध
समजावून घेणे.
Ø    पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या
मनात रुजवणे.
Ø    पुढील पिढ्यांसाठी जैवविविधता टिकवून ठेवण्याची
गरज पटवून देणे.
Ø    प्राण्यांचे व झाडांचे ही केवळ माणसासाठी उपयुक्त
नसून, संपूर्ण परिसंस्थेसाठी ती अत्यावश्यक
आहेत.
Ø    विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे.
Ø    निसर्गावर प्रेम करणे व त्याचे रक्षण करण्याची
जाणीव वाढवणे.
Related Posts
प्रकल्प विषयाचे महत्व  
आपल्या सभोवतालचा नैसर्गिक अधिवास
म्हणजे जंगल, शेतं, नद्या, तलाव,
डोंगर तसेच गावातील झाडं-झुडपं आणि प्राणीपक्षी. या सर्व
गोष्टींमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करणे हे
प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे कारण त्यातून आपणास निसर्गाच्या विविध घटकांची ओळख
होते आणि त्यांचे जीवनाशी असलेले नाते समजते.
नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास
केल्यामुळे आपल्याला पर्यावरणीय संतुलना बाबत अधिक माहिती मिळते व पर्यावरण रक्षण
करणे किती महत्वाचे आहे याबाबत अधिक माहिती मिळते. जर झाडे तोडली गेली किंवा
प्राणी नष्ट झाले तर परिसंस्थेतील साखळी तुटेल आणि मानवी जीवनावर त्याचा वाईट
परिणाम होईल. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व या अभ्यासातून स्पष्ट होते.
सांस्कृतिक दृष्टीकोनातूनही हा
अभ्यास महत्त्वाचा आहे. वड-पिंपळाला धार्मिक महत्त्व आहे, तुळशीला पूजनीय
मानले जाते, गाईला “गौमाता” म्हणतात.
या परंपरांमुळे लोक नकळत संवर्धन करतात. अभ्यासामुळे या श्रद्धांचा वैज्ञानिक
अर्थही समजतो.
नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास विद्यार्थ्यांना निरीक्षण, नोंदवही लेखन, प्रश्न विचारण्याची सवय, शास्त्रीय दृष्टीकोन आणि पर्यावरणाविषयी जबाबदारी शिकवतो. हा अभ्यास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण देतो.
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती
या प्रकल्पाचा उद्देश आपल्या सभोवतालच्या
नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करून वनस्पती व प्राण्यांविषयी माहिती मिळवणे हा आहे. हा
उद्देश साध्य करण्यासाठी विविध कार्यपद्धतींचा उपयोग करण्यात आला. 
1.         
प्रत्यक्ष
निरीक्षण:
माझ्या घराच्या परिसरात, शाळेजवळील बागेत, शेतात व नदीकाठी
फिरून मी विविध वनस्पती व प्राणी प्रत्यक्ष पाहिले. त्यांच्या रंग, आकार, पानांची रचना, फुलांची
वैशिष्ट्ये तसेच प्राण्यांची हालचाल, आवाज, खाण्याच्या सवयी यांचा अभ्यास केला.
2.         
नोंदी
ठेवणे :
निरीक्षण करताना डायरीत नोंदी घेतल्या.
प्रजातींची नावे, दिसण्याचे
ठिकाण, अधिवास, त्यांचे उपयोग व
वैशिष्ट्ये यांची माहिती वेगवेगळ्या शीर्षकाखाली लिहिली.
3.         
छायाचित्रण:
मोबाईल कॅमेराच्या साहाय्याने काही प्रजातींची
छायाचित्रे घेतली. त्यामुळे नंतर त्यांची तुलना करणे व माहिती अचूक लिहिणे सोपे
गेले.
4.         
स्थानिक
लोकांशी चर्चा :
शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व माझ्या घरच्यांशी चर्चा केली. त्यांनी झाडांची स्थानिक
नावे, औषधी गुणधर्म, तसेच त्यांची
उपयुक्तता सांगितली.
5.         
ग्रंथ
व इंटरनेट अभ्यास :
पर्यावरणशास्त्र,
जीवशास्त्र या विषयावरील पुस्तके, शालेय ग्रंथ
तसेच इंटरनेटवरील विश्वासार्ह माहितीचा उपयोग करून अभ्यास अधिक सखोल केला.
6.         
माहितीचे
वर्गीकरण :
गोळा केलेली माहिती दोन गटात विभागली –दोन भागांत विभागली.
वनस्पती (५ प्रजाती) प्राणी (५ प्रजाती)
स्थानिक
लोकांशी चर्चा करण्यासाठी प्रश्नावली 
वनस्पतींविषयी प्रश्न
11.आपल्या
शेतात किंवा गावात वडाची किती झाडे आहेत?
12.पिंपळाची
झाडे कुठे आढळतात व अंदाजे किती आहेत?
13.कडुलिंबाची
झाडे किती प्रमाणात दिसतात? (१-५, ५-१०, १०
पेक्षा जास्त)
14.बहुतेक
घरांमध्ये तुळशीचे कुंडे आहेत का? साधारण किती टक्के घरांमध्ये आहेत?
15.आपल्या
गावात आंब्याची किती झाडे आहेत व ती खाजगी आहेत की सार्वजनिक ठिकाणी?
प्राण्यांविषयी प्रश्न
16.गावात गायींची
संख्या किती आहे? (अंदाजे)
17.कोकिळ
उन्हाळ्यात साधारण किती प्रमाणात ऐकू येते? (कमी, मध्यम,
जास्त)
18.कबूतरांचे
थवे कुठे आढळतात .
19.खारी
गावात किंवा शेतात दिसतात का? एका वेळी किती खारी दिसतात?
20.पावसाळ्यात
बेडूक किती प्रमाणात ऐकू येतात? (कमी, मध्यम,
जास्त)
अतिरिक्त माहिती जाणून घेण्यासाठी
21.गेल्या ५
वर्षांत गावात झाडांची संख्या वाढली आहे का कमी झाली आहे?
22.प्राण्यांच्या
संख्येत काही बदल जाणवतो का? (उदा. पक्ष्यांची संख्या घटली आहे का?)
23.लोक नवीन
झाडं लावतात का? दरवर्षी किती प्रमाणात?
24.प्राण्यांच्या
संख्येत घट होण्याची कारणं काय असू शकतात असं वाटतं?
25.गावात
कोणत्या प्राणी किंवा वनस्पती प्रजाती सर्वाधिक दिसतात?
प्रकल्प निरीक्षणे  
प्रश्नावली द्वारे मिळालेली
माहिती. 
| प्रजाती | अंदाजे संख्या | विशेष नोंदी | 
| वड | १५ | मंदिराजवळ अधिक | 
| पिंपळ | ८ | चौकात व नदीकाठी | 
| गाय | ५० | कळपात ठेवतात | 
| कबूतर | ३०-४० (थवे) | मंदिराजवळ | 
| बेडूक | जास्त | पावसाळ्यात | 
वनस्पती
निरीक्षण
| वनस्पती | वैशिष्ट्ये | उपयोग | पर्यावरणीय भूमिका | 
| वड | मोठ्या जागेवर विस्तारलेले. | औषधी, धार्मिक | पक्ष्यांना आश्रय | 
| पिंपळ | हृदयाकृती पाने | औषधी | ऑक्सिजन निर्मिती | 
| कडुलिंब | कडवट पाने, औषधी | दातुन, खत | कीटकनाशक | 
| तुळस | पवित्र वनस्पती | औषधी, धार्मिक | घरातील स्वच्छता | 
| आंबा | फळांचा राजा | आंबा, लोणची | मधमाश्यांसाठी अन्न | 
प्राणी निरीक्षण
| प्राणी | वैशिष्ट्ये | उपयोग/महत्त्व | पर्यावरणीय भूमिका | 
| गाय | दुधाळ प्राणी | दूध, शेण | कृषी मदत, धार्मिक महत्त्व | 
| कोकिळ | गोड गाणे | सांस्कृतिक महत्त्व | परागीभवनास मदत | 
| कबूतर | समूहात राहतात | शांतीचे प्रतीक | अन्नसाखळीचा भाग | 
| खार | झपाट्याने धावणारी | मनोरंजन, जैवविविधता | बियांचे प्रसारण | 
| बेडूक | उभयचर | शेतकऱ्याचा मित्र | डास नियंत्रण | 
वनस्पती
| वनस्पती | अंदाजे संख्या | स्थान/वितरण | विशेष नोंद | 
| वड | १५ | मंदिराजवळ, चौकात | धार्मिक महत्त्व | 
| पिंपळ | ८ | नदीकिनारी, चौकात | पूजनीय | 
| कडुलिंब | १२–१५ | शाळा, शेताच्या कडेला | औषधी उपयोग | 
| तुळस | 90% घरांमध्ये | अंगणात | पवित्र मानली जाते | 
| आंबा | २५ | शेतं व बाग | आर्थिक उपयोग | 
प्राणी
| प्राणी | अंदाजे संख्या | स्थान/वितरण | विशेष नोंद | 
| गाय | ५० | प्रत्येक घर, गोठा | दूध व खत | 
| कोकिळ | मध्यम प्रमाण | उन्हाळ्यात झाडांवर | आवाज गोड | 
| कबूतर | ३०–४० (थाव्यांमध्ये) | मंदिराजवळ | धान्यावर उपजीविका | 
| खारी | ३–४ (एकावेळी) | झाडं, शेतं | बिया पेरण्याची सवय | 
| बेडूक | जास्त | पावसाळ्यात शेतं | डास खातात | 
प्रकल्प विश्लेषण
1.        
वनस्पती
1)        
वडाचे झाड
परिचय :
            भारतातील पवित्र व उपयुक्त झाडांमध्ये वडाचे झाड
सर्वात महत्त्वाचे मानले जाते. याचे शास्त्रीय नाव Ficus benghalensis असे आहे. हे झाड
मोठे, विस्तीर्ण फांद्यांचे असते. भारतीय संस्कृतीत वडाचे
झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले
जाते.
अधिवास :
वडाचे झाड भारतभर सर्वत्र आढळते.
हे झाड प्रामुख्याने कोरड्या व दमट हवामानात सहज वाढते. गावांच्या चौकात, मंदिरे, तलाव, रस्त्यांच्या कडेला हे झाड सहज दिसते. वाडाची मुळे
फांद्यांपासून निघून  जमिनीत शिरून नवी
मुळे व खोड तयार करतात, त्यामुळे झाडाला मोठ्या क्षेत्रावर
पसरायला मदत होते.
वैशिष्ट्ये :
· वडाचे झाड फार मोठे आणि उंच वाढते.
· पाने मोठी, अंडाकृती व गडद हिरव्या रंगाची असतात.
· याच्या फांद्यांमधून खाली येणाऱ्या हवाई मुळ्या हे झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
· हे झाड शेकडो वर्षे जगते; काही वडाची झाडे हजारो वर्षे जुनी असल्याचे नोंदले गेले आहे.
· वडाच्या झाडाला फुले फारशी दिसत नाहीत; फळे मात्र लहान व गोलसर असतात.
उपयोग :
औषधी उपयोग:
· वडाच्या सालीतून निघणारा दुधाळ रस (latex) त्वचारोग, दातदुखी व जखम भरून काढण्यासाठी उपयुक्त असतो.
· पाने व मुळे यांचा वापर पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.
· वडाच्या फळांचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यासाठी होतो.
पर्यावरणीय उपयोग:
· वडाचे झाड कार्बन डायऑक्साइड शोषून मोठ्या प्रमाणात प्राणवायू देते.
· पक्षी, खार, माकड इत्यादी अनेक प्राण्यांना अन्न व आसरा देते.
· मातीची धूप थांबवण्यात याची मुळे महत्त्वाची भूमिका बजावतात.
पर्यावरणातील भूमिका :
वाडाच्या झाडावर अनेक पक्षी, कीटक, प्राणी आपले घर करतात. झाडाची फळे पक्ष्यांना अन्न देतात आणि त्याच वेळी
बिया पसरवण्याचे कामही होते. त्यामुळे जैवविविधता टिकवण्यासाठी वड महत्त्वाचे
ठरते.
2) पिंपळाचे झाड
परिचय :
        पिंपळाचे झाड (Ficus religiosa) हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय
मानले जाते. बौद्ध धर्मात भगवान गौतम बुद्धांनी या झाडाखाली ज्ञानप्राप्ती केली
होती. त्यामुळे पिंपळाला "बोधिवृक्ष" म्हणूनही ओळखले जाते.
अधिवास :
पिंपळाचे झाड उष्णकटिबंधीय
हवामानात सहज वाढते. भारतातील ग्रामीण भागात, रस्त्याच्या कडेला, मंदिरे व गावांच्या चौकात हे झाड मोठ्या प्रमाणावर आढळते.
वैशिष्ट्ये :
· पिंपळाचे झाड उंच, फांद्या विस्तीर्ण व दाट असतात.
· पाने हृदयाकृती, टोकाला लांब वळलेली असतात.
· पिंपळाच्या झाडाचे आयुष्य हे शेकडो वर्षे असते.
· पिंपळाला येणारी लहान फळे पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरतात.
उपयोग :
1.         
औषधी उपयोग :
· पिंपळाच्या पानांचा रस दमा व श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त आहे.
· सालीचे काढे पचन सुधारण्यासाठी घेतले जातात.
· पानांचे वाळवलेले चूर्ण त्वचारोगांवर उपयुक्त ठरते.
2. पर्यावरणीय उपयोग :
· पिंपळाचे झाड रात्रीदेखील थोड्या प्रमाणात प्राणवायू सोडते, अशी मान्यता आहे.
· अनेक पक्षी, खार, माकडे व कीटकांना आसरा मिळतो.
· पिंपळ मातीची धूप रोखतो.
पर्यावरणातील भूमिका :
पिंपळाचे झाड जैवविविधतेसाठी
अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या सावलीत अनेक वनस्पती उगवतात. तसेच याच्या
फळांमुळे बिया पसरतात व परिसंस्था टिकवली जाते.
3) कडुलिंब
परिचय :
            कडुलिंब (Azadirachta indica) हे औषधी
गुणधर्मांसाठी जगप्रसिद्ध झाड आहे. याला "Village pharmacy" असे या झाडाला म्हटले जाते.
अधिवास :
भारत, आफ्रिका, आशिया
या उष्णकटिबंधीय भागात सहज आढळते.
वैशिष्ट्ये :
· कडुलिंबाची पाने लांबट, कडवट चवीची असतात.
· याला लहान पांढरी फुले व हिरवी फळे.
· कडुलिंबाचे झाड १५–२० मीटरपर्यंत वाढते.
उपयोग :
1) औषधी उपयोग :
· पाने कडू असली तरी त्वचारोग, मलेरिया, सर्दी यावर उपयुक्त.
· कडुलिंबाचे तेल केस व त्वचेसाठी औषधासारखे वापरले जाते.
· कडुलिंबाची दातुन दातांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
· सामाजिक व आर्थिक उपयोग :
· गावातील प्रत्येक अंगणात कडुलिंबाचे झाड असते.
· कडुलिंबाच्या फांद्या कीटकनाशक म्हणून वापरतात.
2) पर्यावरणीय उपयोग :
· हवा शुद्ध करण्यासाठी महत्त्वाचे झाड.
· मातीची सुपीकता टिकवते.
4)        
आंबा 
परिचय
:
                      आंबा
हा भारताचा "राष्ट्रीय फळांचा राजा" मानला जातो. हजारो वर्षांपासून
भारतीय संस्कृतीत, धार्मिक विधींमध्ये आणि आहारात आंब्याचे
महत्त्व आहे. त्याला फक्त स्वादिष्ट फळ म्हणून नव्हे, तर
औषधी, आर्थिक, पर्यावरणीय आणि
सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त मानले जाते. भारतातील विविध प्रदेशांत
आंब्याची अनेक जात आढळतात. फळे गोडसर, रसाळ आणि पोषक असतात.
आंब्याचे शास्त्रीय नाव Mangifera indica आहे. इंग्रजीत त्याला Mango म्हणतात. आंबा उष्णकटिबंधीय प्रदेशातील झाड असून उंची व फांद्या दाट
असतात. पानं गडद हिरवी व मोठी असतात. 
अधिवास व वैशिष्ट्ये :
आंबा प्रामुख्याने भारतातील उष्णकटिबंधीय आणि
उपउष्णकटिबंधीय भागात आढळतो. राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका,
केरळ, तमिळनाडू आणि प. बंगाल यांसारख्या
राज्यांमध्ये आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
झाडाची उंची साधारण १०–३० फूट असते. पानं मोठी, चमकदार व गडद हिरवी असतात. फुलं लहान, जांभळट किंवा पिवळीसर असतात त्यांना मोहोर असे म्हणतात. आंबा फळाचा आकार
लांबट, गोलसर असतो. झाडाची मुळे खोलवर जातात. त्यामुळे तो
उष्णकटिबंधीय प्रदेशातल्या हवामानाशी सहज जुळवून घेतो. 
आहार व औषधी उपयोग :
आंबा फळामध्ये जीवनसत्त्व A, C, E, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस इत्यादींचा समावेश असतो.
1.  फळे : गोडसर आंबा, रसाळ. कच्चा आंबा लोणच्यासाठी उपयुक्त असतो. त्याच्यापासून सरबत , जॅम व रस  यांसारखे पदार्थ तयार करून
विकले जातात.
2.    पाने
: काही प्राचीन औषधांमध्ये आंब्याची
पाने उकडून त्याचा अर्क दात किंवा जिभेच्या आजारांवर वापरतात.
3.    फळांचा
रस: गळ्याच्या खोकला, ताप, पोटदुखी, दस्त यासाठी पारंपारिक औषधी म्हणून वापरला जातो.
4.  लाकूड: आंब्याचे लाकूड टिकाऊ असून घरगुती व फर्निचर
तयार करण्यासाठी वापरतात.
- Parisaratil Jaiv vividhata  prakalp
 Parisaratil Jaiv vividhata
- Parisaratil Jaiv vividhata  prakalp 11vi 12vi
 Paryavaran prakalp pdf jaiv vividhata
- Paryavaran prakalp pdf jaiv vividhata
पर्यावरणीय
भूमिका :
                आंबा निसर्गातील महत्त्वाचे झाड आहे.
1.    पक्ष्यांसाठी
अधिवास: आंब्यावर पक्षी, वटवाघळे, खार इत्यादी प्राणी
अवलंबून राहतात. फळे व पाने त्यांचा अन्नस्रोत असतात.
2.     बीज
प्रसार: प्राणी फळे
खाल्ल्यानंतर बीजे दूरवर सोडतात. त्यामुळे नवीन झाडे उगवतात.
3.  हवा
शुद्ध करणे: मोठ्या पानांमुळे
आंब्याचे झाड वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषते आणि ऑक्सिजन उत्सर्जित करते.
4.     
मृदा
संरक्षण: त्याच्या मुळे
जमिनीतून पाणी शोषून घेतात व मृदा खुरकट होण्यापासून संरक्षण करतात.
5)        
तुळस 
परिचय :
                तुळस हे लहान पण पूजनीय औषधी झुडूप आहे, जे प्रत्येक भारतीय घरात आढळते. त्याला संस्कृतमध्ये "तुलसी"
म्हणतात. तुळस भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि
आयुर्वेदिक औषधशास्त्रात अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक घरात तुळशीचे रोप असण्याचे
कारण फक्त धार्मिक नसून, तिच्या औषधी व पर्यावरणीय
उपयुक्ततेमुळे आहे. 
तुळशीचे शास्त्रीय नाव Ocimum sanctum आहे.
इंग्रजीत याला Holy Basil म्हणतात. तुळस हे
उष्णकटिबंधीय प्रदेशातील झुडूप असून भारतात घरगुती तसेच बागेत सहज उगवते.
अधिवास व वैशिष्ट्ये :
तुळशीचे झाड 
१–२ फूट उंच असते. पाने हिरवी असतात. पानांचा सुगंध कीटक टाळण्यास मदत
करतो. लहान जांभळट किंवा पांढऱसरसर फुले जमून येतात. तुळस वाढायला फार सोपी आहे, त्यामुळे ती घरच्या अंगणात किंवा बागेत सहज वाढते.
तुळशीचे झाड कमी पाण्यात देखील जगते.  उष्णकटिबंधीय हवामानात ती वर्षभर हिरवीगार राहते.
तिच्या पानांचा सुगंध कीटक दूर ठेवण्यास मदत करतो. 
औषधी
उपयोग :
          तुळस हे आयुर्वेदिक औषधशास्त्रात अत्यंत प्रसिद्ध आहे.
1.        सर्दी, खोकला, तापावर: तुळशीची पाने उकडून काढा तयार करणे किंवा
पानांचा रस घेणे उपयुक्त ठरते.
2.   रोगप्रतिकारक
शक्ती वाढवते: तुळस नियमित सेवन
केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोग कमी होतात.
तुळसाचे पान, बी,
मुळे, फुले सर्व औषधी उपयोगात येतात. तुळस
प्रत्यक्ष आहारात घालून देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते.
पर्यावरणीय महत्व :
तुळस केवळ धार्मिक व औषधी उपयोगापुरती मर्यादित नाही. तिचे पर्यावरणीय फायदे खूप मोठे आहेत.
1.               
हवा
शुद्ध करणे: तुळस झुडूप हवेत
प्रदूषण कमी करण्यास मदत करते.
2.               
कीटक
निवारण: घरातील डास, माशा आणि इतर कीटक दूर राहण्यासाठी तुळस उपयुक्त आहे.
3.               
नैसर्गिक
सौंदर्य: बागेत तुळशीचे झुडूप निसर्गसौंदर्यात
भर घालते.
2) प्राणी /पक्षी
1.        
कोकिळ
                भारतीय उपखंडातील पक्षिजगतामध्ये कोकिळ या पक्षाचे विशेष
स्थान आहे. "कू कू" असा त्याचा मधुर आवाज ऐकताच प्रत्येकाच्या मनात
आनंदाचे, वसंत ऋतूचे आणि सौंदर्याचे भाव
जागृत होतात. कोकिळाचा आवाज वसंत ऋतूचे आगमन सूचित करतो, म्हणूनच
कवी, साहित्यिक आणि कलाकारांनी या पक्ष्याला विशेष स्थान
दिले आहे. भारतीय लोकगीतांपासून शास्त्रीय काव्यापर्यंत, भक्तिगीतांपासून
आधुनिक गाण्यांपर्यंत कोकिळाच्या सुरेल गाण्याचा उल्लेख वारंवार आढळतो.
कोकिळाचे शास्त्रीय नाव Eudynamys scolopaceus असे आहे. इंग्रजीत त्याला Asian Koel असे
म्हणतात. "कोकिळ" हा शब्द ऐकताच मनात पहिली आठवण होते ती म्हणजे त्याचा
गोड आवाज. त्याच्या या गोड गाण्यामुळेच लोकांच्या मनात कोकिळाला "सुरेलतेचा
दूत" असे मानले जाते.
अधिवास व वैशिष्ट्ये :
                कोकिळ हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो. हा पक्षी  वड, पिंपळ, आंबा, फणस यांसारख्या मोठ्या झाडांवर राहतो. शहरी
भागातील बागा व उपनगरातील दाट झाडे यांवरही कोकिळांचे वास्तव्य असते. नर कोकिळ
काळ्या रंगाचा, चमकदार पिसांचा असतो. त्याचे डोळे गडद लालसर
असून लांब शेपटीमुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मादी मात्र करड्या-पांढऱ्या
रंगाच्या चट्टेदार पिसांची असते, ज्यामुळे ती ओळखण्यास सोपी
जाते. चोच टोकदार व किंचित वाकडी असते, जी फळे व कीटक खाताना
अत्यंत उपयुक्त ठरते.
आहार
व जीवनशैली :
  कोकिळ
प्रामुख्याने शाकाहारी असला तरी तो संधीसाधूपणे कीटकही खातो. त्याच्या आहारात आंबे, जांभूळ, बोर, अंजीर, पिंपळाची फळे तसेच लहान कीटक व अळ्या यांचा
समावेश होतो. विशेषतः आंब्याच्या हंगामात कोकिळांचे आवाज अधिक ऐकू येतात, म्हणून लोककथांमध्ये आंबा आणि कोकिळ हे एकमेकांशी जोडले गेले आहेत.तो
प्रामुख्याने पहाटे व संध्याकाळी सक्रिय असतो. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या
सुरुवातीला त्याचा आवाज सर्वाधिक ऐकू येतो.
उपयोग व पर्यावरणीय भूमिका :
कोकिळ हा केवळ गाणारा पक्षी नाही तर पर्यावरणीय
दृष्ट्याही महत्त्वाचा घटक आहे.
1.     
कीटक
नियंत्रण : कीटक व अळ्या खाऊन तो
शेतीस उपयुक्त ठरतो.
2.  बीज
प्रसार : फळे खाताना तो बिया
दूरवर पसरवतो. यामुळे झाडांची संख्या वाढण्यास मदत होते.
3.   पर्यावरणीय
संकेतक : कोकिळाचा आवाज हा ऋतू
बदलण्याचा संकेत देतो. उन्हाळा संपताच वसंत व पावसाळ्याची चाहूल कोकिळाच्या
गाण्याने कळते.
2.        
गाय 
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 11वी pdf
जैव विविधता प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण
जैव विविधतेचा अभ्यास प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये
गाईचे शरीर मजबूत, चार पायांचे आणि
लांब शेपटीचे असते. त्वचेचा रंग पांढरा, काळा, तपकिरी, राखाडी किंवा मिश्र असू शकतो. डोक्यावरची
शिंगे टोकदार व किंचित उंचावलेली असतात. भारतीय हवामानाशी जुळवून घेणाऱ्या अनेक
जाती आपल्या देशात आहेत – जसे की गिर, साहीवाल, लाल सिंधी, थारपारकर इत्यादी. काही गाई दूध
देण्यासाठी प्रसिद्ध आहेत,
गाईचा अधिवास आणि जीवनशैली
गाय प्रामुख्याने ग्रामीण भागात
पाळली जाते. शेतकरी कुटुंबात तिचा मान अगदी आईसमान असतो. डेअरी फॉर्ममध्ये मोठ्या
प्रमाणावर गाईंची पैदास केली जाते. गाईला हिरव्या गवताचे, चाऱ्याचे, डाळींच्या टरफल्यांचे तसेच कडधान्यांच्या पेंडांचे खूप आकर्षण असते.
गाईचे उपयोग
1.               
आर्थिक आणि अन्नपूरक उपयोग
·      
गाईचे दूध हे प्रथिनयुक्त, कॅल्शियमसमृद्ध व
सहज पचणारे पेय आहे.
·      
दुधापासून दही, ताक, लोणी,
तूप, चीज, आईस्क्रीम
यांसारखे पदार्थ तयार होतात.
·      
गाईच्या शेणाचा खत म्हणून शेतीत मोठ्या प्रमाणावर
उपयोग होतो. जैविक शेतीसाठी तर हे खत अनमोल आहे.
·      
गाईचे मूत्र पारंपरिक वैद्यकशास्त्रात औषधी मानले
जाते.
2.               
पर्यावरणीय उपयोग
·      
गाईच्या शेणापासून गोवऱ्या तयार करून पारंपरिक
घरांच्या भिंतींना व जमिनीला लेपण केले जाते. यामुळे घर थंड राहते तसेच कीटक दूर
राहतात.
·      
शेण व मूत्र यांचा वापर सेंद्रिय कीटकनाशक व खत
म्हणून होतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.
गाय ही फक्त दूध देणारी पाळीव
प्राणी नाही. ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्याच्या जीवनात ती
आधारवड आहे, तर समाजात ती मातेसमान आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही
तिचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे "गौ माता" हा शब्द केवळ श्रद्धेतून
नाही तर उपकारातूनही योग्य ठरतो.
3.        
बेडूक
परिचय :
बेडूक हा जगभर आढळणारा आणि अत्यंत महत्त्वाचा
उभयचर प्राणी आहे. उभयचर म्हणजे असा जीव जो पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी राहू
शकतो. त्यामुळे त्याचे जीवनचरित्र इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आणि विशेष आहे.
भारतात सर्वसाधारणपणे पावसाळ्यात बेडकांचा आवाज मोठ्या प्रमाणावर ऐकू येतो.
"टर्र-टर्र" असा त्यांचा सूर गावाबाहेरील शेतात, पाणथळ जागेत, ओढे-तलावांच्या
काठावर सतत घुमताना आपल्याला ऐकू येतो. बेडूक हा प्राणी पर्यावरणीय संतुलन
राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
बेडूकाचे शास्त्रीय नाव Rana tigrina असे आहे. त्याला इंग्रजीत "Indian
Bullfrog" म्हणतात. हा आशियातील एक प्रसिद्ध प्रजाती असून तो
प्रामुख्याने भारत, बांगलादेश, नेपाळ,
श्रीलंका या देशांमध्ये आढळतो. शास्त्रज्ञांच्या मते, "बेडूक हा निसर्गाचा कीटकनाशक" आहे.
अधिवास व वैशिष्ट्ये :
बेडूक प्रामुख्याने दमट व पाणथळ प्रदेशात राहतो.
तलाव, नद्या, ओढे,
धरणे, दलदलीची ठिकाणे, शेतातील
पाणी याठिकाणी तो मोठ्या प्रमाणात आढळतो. पावसाळा हा त्याच्या प्रजननाचा काळ
असल्याने त्या वेळी त्याची संख्या व आवाज अधिक जाणवतो. उन्हाळ्यात मात्र अनेक
बेडूक जमिनीत खोल बिळे करून शीतनिद्रा घेतात, ज्याला
ऐस्टिव्हेशन म्हणतात. थंडीच्या काळात ते निद्रिस्त राहतात, याला
हायबरनेशन म्हणतात.
शरीररचनेच्या दृष्टीने बेडूक मऊ व गुळगुळीत
त्वचेचा असतो. त्याची त्वचा अर्धपारदर्शक असते व त्यावरून श्वसनाची प्रक्रिया
देखील चालते. रंग हिरवट, तपकिरी,
पिवळसर अशा छटा दिसतात, ज्यामुळे तो आपल्या
परिसरात सहज मिसळून जातो. 
बेडूकाचे डोळे उभट व बाहेर आलेले असतात, त्यामुळे त्याला चारही बाजूचा परिसर सहज दिसतो.
डोळ्यांवर "nictitating membrane" नावाचा एक
पारदर्शक पडदा असतो, जो डोळे ओले ठेवतो व पाण्यात पोहताना
त्यांचे संरक्षण करतो. कानासारखी टायम्पॅनम ही रचना डोक्याच्या बाजूस असते,
जी आवाज ऐकण्यासाठी उपयोगी पडते.
आहार व जीवनशैली :
बेडूक प्रामुख्याने कीटकाहारी आहे. तो डास, माशा, गवतटोळे, कोळी, अळी अशा लहान प्राण्यांना खातो. त्यामुळे तो
शेती व मानवासाठी उपयुक्त ठरतो. काही वेळा तो स्वतःपेक्षा लहान बेडकांनाही खातो. बेडूक
निशाचर प्राणी असल्याने रात्री जास्त सक्रिय असतो. 
उपयोग व पर्यावरणीय भूमिका :
बेडूक निसर्गात अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचे
काही प्रमुख उपयोग पुढीलप्रमाणे आहेत - 
कीटक नियंत्रण :
बेडूक डास, माशा व शेतीला हानी करणारे कीटक खातो. त्यामुळे नैसर्गिकरित्या
कीटकनाशकाचे काम तो करतो. शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशके कमी वापरावी लागतात.
अन्नसाखळीतील स्थान :
बेडूक स्वतः कीटक खातो, पण त्यालाही साप, पक्षी, मासे, मगरी इत्यादी प्राणी खातात. त्यामुळे तो
अन्नसाखळीत मधला दुवा आहे व परिसंस्थेचे संतुलन राखतो.
पर्यावरणाचे सूचक :
बेडूकाचे अस्तित्व हे परिसर स्वच्छ व निरोगी
असल्याचे लक्षण आहे. पाण्यातील प्रदूषण किंवा रासायनिक बदल झाल्यास बेडकांची
संख्या सर्वप्रथम घटते. त्यामुळे त्याला "बायो-इंडिकेटर" मानले जाते.
4.        
खार 
परिचय :
खार हा आपल्या अंगणात, शेतात, झाडांच्या फांद्यांवर सतत
उड्या मारताना दिसणारा लहान, चपळ आणि गोड दिसणारा प्राणी
आहे. भारतातील ग्रामीण तसेच शहरी परिसरात खारींचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो.
खारीचे शास्त्रीय नाव Funambulus
palmarum असे आहे. इंग्रजीत तिला Indian Palm Squirrel असे म्हणतात. 
अधिवास व वैशिष्ट्ये :
खारींचा अधिवास अत्यंत विविध प्रकारचा आहे. बागा, शेत, झाडांच्या फांद्या, घरांच्या छपरांवर, शहरातील उद्यानांत ती आढळते.
माणसांच्या जवळ राहण्याची तिची क्षमता खूप जास्त आहे. म्हणूनच ग्रामीण भागापासून
शहरापर्यंत सर्वत्र खारींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते.
शारीरिकदृष्ट्या खार लहान आकाराची असते. तिचे
शरीर सडपातळ, केसाळ व लांबी
साधारण १५-२० सेंमी असते. शेपटी लांब, झुपकेदार व केसाळ
असते. धावतानाही किंवा फांदीवर बसतानाही ती शेपटी संतुलन राखण्यासाठी वापरते. डोळे
गोल, काळे व चमकदार असतात, ज्यामुळे
तिला सतत सावध राहता येते.
आहार व जीवनशैली :
खार सर्वभक्षी प्रवृत्तीची आहे, पण ती मुख्यतः शाकाहारी आहार घेते. ती लहान कीटक,
बिया, फळे, कडधान्ये,
शेंगदाणे, धान्य इत्यादी खाते. शेतात पडलेले
धान्य, फळांच्या झाडांवरील पिकलेली फळे खाते . खार दिवसा सक्रिय
असते. 
खारीचे उपयोग व पर्यावरणीय भूमिका :
बियांचे प्रसारण : खारींची सर्वात मोठी भूमिका
म्हणजे बीजप्रसार. ती फळे व बिया खाल्ल्यानंतर काही बिया इतर ठिकाणी टाकते. या
बियांपासून नवीन रोपे उगवतात. त्यामुळे जंगलांचे पुनरुत्पादन व हरिताईचे संवर्धन
खारींमुळे होते.
शेतीचे रक्षण : खारी कीटक खाते. शेतातील पिकांवर हल्ला करणारे लहान कीटक
व अळी खाऊन ती शेतीचे संरक्षण करते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करता
येतो. खार स्वतः पक्षी, साप,
मांजर यांसारख्या प्राण्यांचे भक्ष्य बनते. त्यामुळे ती
अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.
5.        
कबूतर
परिचय :
कबूतर हा पक्षी प्राचीन काळापासून मानवी जीवनाशी
जोडलेला आहे. तो शांती, प्रेम
आणि सौहार्द यांचे प्रतीक मानला जातो. कबूतर हे “शांतीचे
दूत” म्हणून ओळखले जाते.
कबूतरांचे शास्त्रीय नाव Columba livia domestica असे आहे. इंग्रजीत त्याला Pigeon
किंवा Dove म्हणतात. माणसाने सर्वात आधी
पाळलेल्या पक्ष्यांमध्ये कबूतराचा समावेश होतो. त्याच्या विश्वासू स्वभावामुळे व
परत येण्याच्या क्षमतेमुळे हजारो वर्षे त्याचा वापर संदेशवहनासाठी करण्यात आला.
अधिवास व वैशिष्ट्ये :
कबूतरांचा अधिवास अत्यंत विस्तृत आहे. ते
गावांपासून शहरांपर्यंत, जुन्या
इमारतींवर, मंदिरांमध्ये, किल्ल्यांवर,
रेल्वे स्टेशनवर, चौकात व बाजारपेठेत मोठ्या
प्रमाणावर आढळतात. माणसांच्या सहवासात राहण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय आहे.
शारीरिकदृष्ट्या कबूतर मध्यम आकाराचे पक्षी
आहेत. त्यांचे शरीर गुळगुळीत राखाडी रंगाचे असून पंखांवर काळसर ठिपके असतात.
छातीचा भाग निळसर-हिरवट चमकदार दिसतो. डोळे लालसर किंवा केशरी रंगाचे असतात. चोच
लहान, बारीक व टोकदार असून तिच्या
मुळाशी एक मऊ पांढरा भाग (cere) असतो. पाय लहान व लालसर
असतात.
कबूतरांची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यांची
उडण्याची क्षमता. ते अतिशय वेगाने व लांब पल्ल्यापर्यंत उडू शकतात. शिवाय, त्यांना आपल्या घरट्याचा अचूक पत्ता लक्षात ठेवण्याची
विलक्षण क्षमता असते. त्यामुळेच प्राचीन काळी कबूतरांचा वापर संदेशवाहक म्हणून
केला जात असे. कबूतर हे समूहप्रिय पक्षी आहेत. 
आहार व जीवनशैली :
कबूतर हे मुख्यतः शाकाहारी आहेत. त्यांचा आहार
धान्य, तांदूळ, गहू,
मका, बाजरी, हरभरा,
तूर, तसेच लहान बिया यांचा असतो. शहरी भागात
लोक त्यांना दाणे घालतात. काही वेळा कबूतर फळांचे तुकडे, ब्रेडचे
कण व इतर हलके पदार्थ खातात.
पर्यावरणीय भूमिका :
कबूतर नुसते मानवी इतिहासातच नाही तर पर्यावरणीय
संतुलनातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ते बिया व धान्य खाऊन दूरवर पसरवतात, ज्यामुळे बीजप्रसार होतो. अनेक शिकारी पक्ष्यांचे भक्ष्य
बनतात, त्यामुळे अन्नसाखळीचे संतुलन राखले जाते.
 प्रकल्प निष्कर्ष  
या प्रकल्पाच्या अभ्यासातून आपल्या
सभोवतालच्या नैसर्गिक अधिवासाविषयी समृद्ध माहिती मिळाली. प्रकल्पाचा उद्देश फक्त
झाडे व प्राणी यांची यादी तयार करणे नव्हता, तर त्यांचे पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक
आणि आरोग्यविषयक महत्त्व समजून घेणे होता. या दृष्टीने पाहिले असता, अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यात नवे दृष्टिकोन समोर आले.
१. पर्यावरणीय महत्त्व
वनस्पती व प्राणी यांच्यातील
निसर्गसाखळी (Food Chain) आणि परस्परसंबंध स्पष्टपणे दिसून येतो. झाडे
ऑक्सिजन देतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि हवामान
संतुलित ठेवतात. गाईसारखे प्राणी शेतीला खत देतात. बेडूक किडे खात असल्यामुळे
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात. कबूतर व खारी बिया पसरवून झाडांच्या पुनरुत्पादनात
हातभार लावतात. या साखळीतले प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. जर एखादी प्रजाती नष्ट
झाली, तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो.
२. सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व
ग्रामीण भागातील लोक अजूनही झाडे व
प्राण्यांना पूजनीय मानतात. वड, पिंपळ, तुळस
यांची पूजा केली जाते. आंबा हा सण-उत्सवात आवश्यक असतो. गाईला “गौमाता” म्हणून आदर
दिला जातो. कोकिळेचा आवाज ऋतूचक्राशी जोडला गेला आहे. या श्रद्धा आणि परंपरा लोकांना
निसर्गाशी घट्ट बांधून ठेवतात. त्यामुळे केवळ पर्यावरणीयच नव्हे तर सांस्कृतिक जपणूकही
घडते.
३. आर्थिक महत्त्व
वनस्पती आणि प्राण्यांमुळे ग्रामीण
अर्थव्यवस्था टिकून राहते. आंबा फळांमुळे उत्पन्न मिळते. गाईच्या दुधातून व
शेणखतातून शेतकऱ्यांना थेट फायदा होतो. तुळस, कडुलिंब यांचा औषधी उपयोग केल्याने
औषधांवरील खर्च कमी होतो. कबूतरांसारख्या पक्ष्यांमुळे अप्रत्यक्षरित्या
पर्यटनालाही चालना मिळते.
४. आरोग्यविषयक पैलू
कडुलिंबाची पाने, तुळशीचे औषधी गुण,
बेडकांमुळे होणारे डास नियंत्रण यामुळे आरोग्य लाभते. झाडे प्रदूषण शोषून
घेतात आणि गावचे वातावरण शुद्ध ठेवतात. गाईचे दूध पोषणासाठी महत्त्वाचे आहे. या
सर्व गोष्टींमुळे वनस्पती व प्राणी केवळ पर्यावरण नव्हे तर मानवी आरोग्याशीही
संबंधित आहेत.
५. संवर्धनाची गरज
वनस्पती व प्राण्यांची संख्या
टिकून राहावी यासाठी संवर्धन अत्यावश्यक आहे. झाडांची अंधाधुंद तोड, प्रदूषण, रसायनांचा वापर, पाण्याची टंचाई यामुळे प्राणी व
पक्ष्यांवर परिणाम होतो. लोकसंख्या वाढल्यामुळेही नैसर्गिक अधिवासावर ताण येतो.
म्हणूनच झाडे लावणे, पाण्याचे संवर्धन करणे, रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत वापरणे आणि प्राण्यांचे संरक्षण करणे हे
प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
७. प्रकल्पातून मिळालेला अनुभव
या प्रकल्पामुळे मला वाचून
शिकण्याऐवजी प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली. स्थानिक लोकांशी संवाद
साधताना त्यांचे निसर्गाविषयीचे अनुभव आणि श्रद्धा समजल्या. तक्त्यांच्या
माध्यमातून झाडे व प्राण्यांची संख्या मोजताना शास्त्रीय दृष्टिकोन विकसित झाला.
८. भविष्यासाठी दिशा
·                    
शाळा आणि गावाने एकत्र येऊन वृक्षारोपण करणे.
·                    
लहान मुलांना झाडे लावण्याची आणि त्यांची काळजी
घेण्याची सवय लावणे.
·                    
पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवणे.
·                    
शेतकऱ्यांनी रासायनिक औषधे कमी वापरावीत, जेणेकरून
किड्यांवर उपजीविका करणारे पक्षी व प्राणी वाचतील.
·                    
सरकारच्या योजनांचा उपयोग करून झाडांची लागवड वाढवणे.
प्रकल्प संदर्भ
१. पुस्तके :
"पर्यावरण अभ्यास" – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक
निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे.
"वनस्पती व प्राणीशास्त्र" – डॉ. भालचंद्र कदम, नवा महाराष्ट्र प्रकाशन.
"भारतातील जैवविविधता" – डॉ. माधव गाडगीळ.
२. स्थानिक स्त्रोत :
गावातील वयोवृद्ध व्यक्तींची माहिती (उदा. वड, पिंपळ, तुळशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व).
शेतकरी व पशुपालक यांच्याशी संवाद (गाईंचे महत्त्व, शेणखताचा उपयोग).
स्थानिक वैद्य व शिक्षक (औषधी वनस्पतींचे गुण, प्राण्यांचे आरोग्याशी नाते).
३. शासकीय व शैक्षणिक अहवाल :
महाराष्ट्र शासन – वन विभागाचे माहितीपत्रक.
"National Biodiversity Authority of India" चे संकेतस्थळ.
"India State of Forest Report" – Forest
Survey of India.
४. संकेतस्थळे (वेब स्रोत) :
https://www.india.gov.in
https://www.moef.gov.in
– Ministry of Environment, Forest and Climate Change
https://www.bnhs.org
– Bombay Natural History Society
५. वैयक्तिक निरीक्षणे :
गाव व शाळेच्या परिसरातील थेट निरीक्षण (झाडांची संख्या, प्राण्यांची उपस्थिती).
पावसाळ्यातील बेडकांचा आवाज व उन्हाळ्यातील कोकिळेचे स्वर याविषयी
प्रत्यक्ष अनुभव.
Info!
  प्रकल्प PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील SUBSCRIBE बटणावर क्लिक करून Youtube channel सबस्क्राईब  करा.











