सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती प्रकल्प | Sendriy sheti aani rasayanik sheti prakalp pdf

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 11वी pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय जल प्रदूषण प्रकल्प pdf project पर्यावरण प्रकल्प pdf
Admin

 environment project in marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प


paryavaran 12th project in marathi pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय 12th environment project in marathi pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf practical पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf download


1) प्रकल्प प्रस्तावना - सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास 


            कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !

               प्राचीन काळापासून जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आपण जमिनीला भूमाता असे संबोधतो. ज्याप्रमाणे पशुपक्षी, प्राणी व वनस्पती जिवंत आहे. त्याच प्रमाणे माती सुद्धा जिवंत आहे. त्यात असंख्य जीवजंतू वास्तव्य करून राहतात म्हणून आपण भूमाता सजीव आहे असे समजतो.

              मनुष्य दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे. तो स्वत:च्या फायद्यासाठी शेतजमिनीकडे दुर्लक्ष करतो. मोठ्या प्रमाणवर उत्पन्न मिळविण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणवर रासायनिक शेतीच्या दिशेने वळताना आपल्याला दिसत आहेत. परंपरागत चालत आलेल्या सेंद्रिय शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीतून उत्पन्न घेऊन साऱ्या मानवजातील पुरवणे आजच्या वाढत्या लोकसंखेच्या जगात शक्य नाही हे जितके खरे आहे तितकेच रासायनिक शेतीचे दुष्परिणाम तितकेच जास्त आहे.

            आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

project पर्यावरण प्रकल्प 11 वी विषय pdf | paryavaran prakalp | education marathi


2) प्रकल्प अनुक्रमणिका- पर्यावरण प्रकल्प ११वी १२ वी 


अ.क्र. घटक 

१)     प्रकल्पाची उद्दिष्टे  

२)     विषयाचे महत्व    

३)     प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती    

४)    निरीक्षणे     

६)     विश्लेषण   

८)     निष्कर्ष      

९)     संदर्भ

१०)   अहवाल     

11)   प्रकल्प सेमिनार    

 


3) प्रकल्प उद्दिष्ट्ये - Sendriy Sheti Aani Rasayanik Sheti Abhyas prakalp 

       

१) सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास करणे

            या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सेंद्रिय शेती व रासायनिक शेती या दोन भिन्न शेती पद्धतींचा सखोल तुलनात्मक अभ्यास करणे होय. या तुलनेत दोन्ही पद्धतींमध्ये वापरली जाणारी खते, औषधे, उत्पादन पद्धती, जमिनीवर होणारे परिणाम, उत्पादनाचा दर्जा व खर्च यांचा अभ्यास करण्यात येतो. या अभ्यासातून कोणती शेती पद्धत अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे.


२) सेंद्रिय शेतीचे महत्व जाणून घेणे

        सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरणाचे संरक्षण कसे होते, जमिनीची सुपीकता कशी टिकून राहते तसेच मानवी आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजून घेणे हे या उद्दिष्टामागील प्रमुख हेतू आहे. सेंद्रिय शेती ही दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर व शाश्वत शेती पद्धत असल्याचे या प्रकल्पातून अधोरेखित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.


३) सेंद्रिय खतांचे प्रकार आणि त्यांचे होणारे परिणाम याबाबत माहिती घेणे

        शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खत, माशांचे खत इत्यादी सेंद्रिय खतांचे प्रकार जाणून घेणे तसेच त्यांचा जमिनीच्या पोतावर, पिकांच्या वाढीवर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासणे हे या उद्दिष्टात समाविष्ट आहे.


४) रासायनिक शेतीबाबत माहिती जाणून घेणे

        रासायनिक शेती म्हणजे काय, ती का स्वीकारली गेली, उत्पादन वाढीसाठी तिचा कसा वापर होतो आणि आधुनिक शेतीमध्ये तिचे स्थान काय आहे याबाबत सविस्तर माहिती मिळवणे हे या उद्दिष्टाचे स्वरूप आहे.


५) रासायनिक खतांचे प्रकार आणि त्यांचे होणारे परिणाम याबाबत माहिती जाणून घेणे

        नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य खते यांचे प्रकार, त्यांचा वापर आणि जमिनीवर, पाण्यावर व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून घेणे हे या उद्दिष्टामागील हेतू आहे.


६) सेंद्रिय आणि रासायनिक शेती यांमधील फरक जाणून घेणे

        या उद्दिष्टांतर्गत दोन्ही शेती पद्धतींमधील फरक तक्त्याच्या स्वरूपात मांडून तो स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


७) तुलनात्मक अभ्यासाद्वारे योग्य माहिती इतरांना मिळवून देणे

        या प्रकल्पातून मिळालेली शास्त्रीय व वास्तवाधारित माहिती समाजात पोहोचवून शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांमध्ये शेतीविषयक जनजागृती करणे हे या उद्दिष्टाचे अंतिम स्वरूप आहे.


paryavaran 12th project in marathi pdf  | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय | 12th environment project in marathi pdf

4) प्रकल्प विषयाचे महत्व - paryavaran prakalp pdf

 

        आज आपण सर्वजण आधुनिक व वेगवान जीवनशैली असलेल्या जगात जगत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन अधिक सुलभ झाले असले तरी त्याचबरोबर अनेक गंभीर समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत कमी होत जाणारे अन्नधान्याचे उत्पादन ही आजची एक मोठी समस्या ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांवर अधिक उत्पादन घेण्याचा ताण वाढत चालला आहे.

        या समस्येवर तात्काळ उपाय म्हणून अनेक शेतकरी रासायनिक शेतीकडे वळताना दिसून येतात. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत असल्याचे चित्र दिसते. मात्र या प्रकारच्या शेतीतून मिळणारी उत्पादने दीर्घकालीन दृष्टीने मानवी शरीरासाठी घातक ठरत आहेत. फळे, भाजीपाला आणि धान्यांमध्ये रासायनिक औषधांचे अंश राहतात आणि ते अन्नातून मानवी शरीरात प्रवेश करतात.

        रासायनिक शेतीमुळे केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे तर धरतीमातेवरही गंभीर दुष्परिणाम होत आहेत. सतत रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, जमीन नापीक बनते आणि भूजलाचे प्रदूषण होते. यामुळे निसर्गातील जैवविविधतेचा ऱ्हास होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. तसेच उत्पादनाचा दर्जा कमी होत चालला असून अन्नातील पोषणमूल्ये घटत आहेत.

        वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर, मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि निसर्गावर होणारे अनिष्ट परिणाम या सर्व बाबींचा विचार केला असता सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक, आरोग्यास सुरक्षित आणि दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर शेती पद्धत आहे. त्यामुळे आजच्या काळात सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे ठरते.

       

5) प्रकल्प कार्यपद्धती - sendriy sheti aani rasayanik sheti 

 

        सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध टप्प्यांमध्ये कार्यपद्धती राबविण्यात आली.


१) विषयाची निवड

        सर्वप्रथम पर्यावरण विषयाच्या अभ्यासक्रमानुसार प्रकल्पासाठी योग्य विषय निवडण्यात आला. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या, अन्नधान्याची गरज, आरोग्य समस्या व पर्यावरणीय असंतुलन या बाबी लक्षात घेता सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती हा विषय अत्यंत महत्त्वाचा वाटला. या दोन्ही शेती पद्धतींचा मानवी जीवनावर, निसर्गावर व जमिनीवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी या विषयाची निवड करण्यात आली.

२) उद्दिष्टांची निश्चिती

        विषय निश्चित केल्यानंतर प्रकल्पाची उद्दिष्टे ठरविण्यात आली. सेंद्रिय व रासायनिक शेतीची संकल्पना समजून घेणे, त्यामधील फरक अभ्यासणे, दोन्ही पद्धतींचे फायदे व तोटे जाणून घेणे तसेच योग्य शेती पद्धतीबाबत जनजागृती करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.

३) माहिती संकलन

        प्रकल्पासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी विविध स्रोतांचा वापर करण्यात आला. यामध्ये खालील पद्धतींचा समावेश होता:

अ) पुस्तके व संदर्भ साहित्य

        पर्यावरण, शेती व कृषीशास्त्र विषयक पुस्तके, शालेय पाठ्यपुस्तके तसेच कृषीविषयक मासिके यांचा अभ्यास करण्यात आला. यामधून सेंद्रिय खतांचे प्रकार, रासायनिक खतांचे प्रकार व त्यांचे परिणाम याबाबत शास्त्रीय माहिती मिळाली.

ब) इंटरनेट व संकेतस्थळे

        आधुनिक माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्यात आला. Wikipedia, Vikaspedia यांसारख्या शैक्षणिक संकेतस्थळांवरून सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, खतांचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत माहिती गोळा करण्यात आली.

क) क्षेत्रीय सर्वेक्षण

        स्थानिक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती संकलित करण्यात आली. काही शेतकरी सेंद्रिय शेती करत असल्याचे आढळले तर काही शेतकरी रासायनिक शेतीवर अवलंबून असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून उत्पादन खर्च, उत्पन्न, जमिनीची स्थिती आणि अनुभव जाणून घेण्यात आले.

४) निरीक्षण पद्धत

        संकलित माहितीच्या आधारे निरीक्षणे नोंदविण्यात आली. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता, पिकांचा दर्जा व खर्च यांचा अभ्यास केला. तसेच रासायनिक शेतीमुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण, पाण्याचे प्रदूषण आणि आरोग्यावरील परिणाम यांचे निरीक्षण करण्यात आले.

५) तुलनात्मक अभ्यास

        सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांची तुलना करण्यासाठी तक्त्याचा वापर करण्यात आला. या तुलनेत खालील मुद्द्यांचा समावेश होता:

 वापरले जाणारे खतांचे प्रकार

 उत्पादनाचा दर्जा

 जमिनीची सुपीकता

 उत्पादन खर्च

 पर्यावरणावर होणारे परिणाम

या तुलनात्मक अभ्यासामुळे दोन्ही शेती पद्धतींमधील फरक स्पष्टपणे समजून आला.

६) विश्लेषण

            मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक व आरोग्यास सुरक्षित असल्याचे आढळले; मात्र उत्पादन तुलनेने कमी असल्याचे लक्षात आले. रासायनिक शेतीमुळे तात्पुरते उत्पादन वाढते; परंतु दीर्घकाळात जमिनीची सुपीकता कमी होते व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात हे विश्लेषणातून स्पष्ट झाले.

७) निष्कर्ष काढणे

        निरीक्षणे व विश्लेषणाच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आला. सेंद्रिय शेती ही दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर व शाश्वत असल्याचे दिसून आले, तर रासायनिक शेतीचे दुष्परिणाम गंभीर असल्याचे लक्षात आले.

८) अहवाल लेखन

            शेवटच्या टप्प्यात सर्व माहिती व्यवस्थित मांडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. प्रस्तावना, उद्दिष्टे, माहिती, निरीक्षणे, विश्लेषण, निष्कर्ष व संदर्भ या सर्व घटकांचा समावेश करून प्रकल्प पूर्ण करण्यात आला.


12th environment project in marathi pdf | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf download

6) प्रकल्प निरीक्षणे - paryavarn jalsuraksha prakalp 


1. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती फरक




अ.क्र सेंद्रिय शेती रासायनिक शेती
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. अजैविक घटकांचा वापर करून रासायनिक शेती केली जाते.
पिकांचा दर्जा चांगला पिकांचा दर्जा खालावलेला
रासायनिक शेतीच्या तुलनेत कमी उत्पन्न भरघोस उत्पन्न
जमिनीची सुपीकता वाढते. जमीन नापीक होते.
कमी खर्चिक सेंद्रिय शेतीच्या तुलनेत खर्च जास्त


2.  भारतातील सेंद्रिय उत्पादनांची टक्केवारी

 

 

paryavaran 12th project in marathi pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय 12th environment project in marathi pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf practical पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf download


3.रासायनिक खते आणि त्यांच्या वापरणे जमिनीच्या सामूवर होणारे परिणाम तक्ता


रासायनिक खते आणि त्यांच्या वापरामुळे जमिनीच्या सामूवर होणारे परिणाम
खताचा प्रकार नत्र- स्फुरद- पालाश प्रति १०० वर्ष पूर क्षेत्रात टाकावयाचे प्रमाण अभिक्रियेचा वेग सामूवर परिणाम
अमोनियम सल्फेट 20-00-00 220–450 ग्रॅम वेगवान अति आम्ल (जास्त अॅसिडिक)
कॅल्शियम नायट्रेट 15-00-00 240–680 ग्रॅम वेगवान विरळ (अल्कलाइन)
पोटॅशियम नायट्रेट 13-00-45 220–450 ग्रॅम वेगवान सामान्य (न्यूट्रल)
अमोनियम नायट्रेट 34-00-00 220–320 ग्रॅम वेगवान आम्ल (अॅसिडिक)
युरिया 46-00-00 220–320 ग्रॅम वेगवान किंचित आम्ल
डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी) 18-46-00 220–360 ग्रॅम वेगवान आम्ल
पोटॅशियम क्लोराईड (एमओपी) 00-00-60 220–360 ग्रॅम वेगवान सामान्य (न्यूट्रल)
पोटॅशियम सल्फेट (एसओपी) 00-00-50 220–450 ग्रॅम वेगवान सामान्य (न्यूट्रल)
जिप्सम निरंक 1–2.5 किलो मध्यम विरळ (अल्कलाइन)
गंधक निरंक 40–100 ग्रॅम संथ आम्ल
बोनमील निरंक 2.5 किलो संथ विरळ (अल्कलाइन)


7) प्रकल्प विश्लेषण - educationalmarathi.com

 

1. सेंद्रिय शेती

 

सेंद्रिय शेतीची व्याख्या:

        सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.

        सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.


प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका pdf 12th

2. सेंद्रिय खतांचे प्रकार


        वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.


शेणखत :

            गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.


कंपोस्ट खत :

            शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.


हिरवळीची खते :

            लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.


गांडूळ खत :

            ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.


माशाचे खत:

           समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.

 

खाटीकखान्याचे खत:

        खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.


3. सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे

 

नत्र पुरवठा:

        जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कोंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

 

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते:

        जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.(एक एकरात ८ टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.


स्फुरद व पालाश:


        सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.

 

जमिनीचा सामू:


        सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.


कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी (CEC):

        कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.

 

कर्बाचा पुरवठा:

        कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करुन देतात.


4.सेंद्रिय खतांचा परिणाम


            सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.

 

1. रासायनिक शेती

 

रासायनिक शेती व्याख्या:


रसायनाचा वापर करून केलेली शेती म्हणजे रासायनिक शेती होय.

रासायनिक शेती म्हणजे अजैविक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व त्यांचा उपयोग शेतीसाठी करणे.

        फक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीला मर्यादा येतात. कारण मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता हाच प्रमुख अडसर आहे. यावर मात करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध करून दिली जातात आणि उत्पादन वाढविले जाते. याचबरोबर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरली जातात. अशा प्रकारच्या रासायनिक शेती पद्घतीत काही काळ उत्पादन वाढलेले दिसते; परंतु उत्पादित धान्याची गुणवत्ता कमी झालेली दिसून येते. याशिवाय धान्यामधून मानवाच्या शरीरात जाणारी रासायनिक द्रव्ये शरीरावर घातक परिणाम करतात.

        वनस्पतींना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये दोन प्रकारची असतात १)मुख्य अन्नद्रव्ये आणि २) सूक्ष्म अन्नद्रव्ये. शेणखत , कंपोस्ट किंवा इतर भरखते दिल्यास जमिनीचा पोत सुधारतो, जलधारण क्षमता वाढते व काही प्रमाणात अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढण्यास मदत होते. सेंद्रिय खतांमुळे मुख्य अन्नद्रव्ये उदा. नत्र, स्पुरद आणि पालाश यांची गरज पूर्णपणे भागत नसल्याने रासायनिक खतांचा वापर आवश्यक ठरतो. दुसरे महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी भरखते नसतील किंवा कमी प्रमाणात उपलब्ध असतील त्यावेळी सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक खतांमधून केला जावू शकतो.


2.रासायनिक खताचे प्रकार :


1. नत्रयुक्त खते             : युरिया, अमोनियम सल्फेट

2. स्फुरदयुक्त खते         : सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट

3. पालाशयुक्त खते        : म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश

4. दुय्यम खते               : चुना, गंधक, मॅग्नेशियम

5. सूक्ष्म अन्नद्रव्ये   : जस्त सल्फेट, मोरचूद, हिराकस, मँगनीज     सल्फेट,बोरॅक्स, अमोनियम मॉलिब्डेट

 

3. रासायनिक खतांचे दुष्परिणाम :‌

 

‍१) शेतजमीन नापीक होणे:


            कोणतेही रासायनिक खत हे जसेच्या तसे पिकाला लागत नाही. सूक्ष्मजीवांद्वारे अथवा इतर घटकांमुळे रासायनिक खतांचे विघटन होते आणि पिकाला घेता येईल अशा प्रकारात (Available Form) ते पिकाला मिळते. सर्वच खत पिकाला लागत नाही. काही खतांचा विघटन न झालेला भाग शेतजमीनीत तसाच राहतो. आणि असा वापर न झालेला भाग जमिनीत असलेल्या इतर मुलद्रव्यांबरोबर संयोग होतो. अशाप्रकारे शेतजमीनीत क्षार तयार होतात. आपण शेतजमीनीच्या वरच्या भागात/पृष्ठभागावर पांढरा रंगाचा पट्टा दिसून येतो. हा पट्टा क्षारांचा तयार झालेला असतो. तितका शेतजमिनीचा भाग हा नापीक होत असतो. पंजाबमध्ये फार मोठा शेतजमिनीचा भाग हा रासायनिक खतांच्या वापरामुळे नापीक झालेला आहे.

 

२) जमिनीतील पाण्याचे जलप्रदूषण :

        पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची पद्धत आहे. बरीचशी खते पाण्यात विरघळतात. पाण्याचा जमिनीत निचरा होत असतो. या पाण्याबरोबर खतांचाही निचरा होतो. जास्त पाणी दिले गेले तर हळूहळू हे खतमिश्रित पाणी जमिनीच्या आतील जलसाठ्यात मिसळते. अशा प्रकारे या पाण्याचे प्रदुषण होते. ही प्रक्रिया संथपणे सुरू असते. काही वर्षांनंतर ज्यावेळी दूष्फेन होते त्यावेळी आपल्याला कारणच नाही सापडत. पाण्याचा सामू वाढतो. आणि असे पाणी शेतीसाठी उपयुक्त राहत नाही.

 

३) मानवी शरीरावरील परिणाम :

        भारतात रासायनिक खतांच्या आणि रासायनिक औषधांच्या (किटकनाशके, जंतूनाशके इ.) वापरावर कोणतेही बंधन नाही. आणि असले तरी ते कागदोपत्रीच आहे. किती प्रमाणात तसेच किती वेळा रासायनिक औषध वापरावेयाचे कोणतेही नियम भारतात नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक विषपिकावर फवारले जाते. आणि नाही म्हणावे तरी या औषधांचा अंशफळ/भाजीपाला इ. यात येतोच. असे फळ/भाजीपाला आपल्या शरीरात गेल्यावर त्याचा हळूहळू फरक आपल्यावर दिसून येतोच. याला Slow Poisoning  म्हणतात. आणि काही वर्षांत आपण अशा आजारांमध्ये सापडतो की तिथून ठीक होणे नाहीच. कर्करोग, हृदयरोग इ. यांची संख्या आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे. कर्करोगाच्या बाबतीत तर भारत संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावर आहे. ही सगळ्यात धोकादायक बाब आहे. आणि हे होण्याचं कारण रासायनिक खते व औषधे हेच.


४) शेतीचा उत्पादन खर्चात झालेली वाढ:

        ५ – १० वर्षांपूर्वी एखादा शेतकरी जितके रासायनिक खतांचा वापर करत होता त्याहून जास्त त्याच शेतात वापर करतो. आणि त्यामानाने उत्पादनात वाढ न होता काही वेळा तर कमी झालेले असते. म्हणजेच ५-१० वर्षांपूर्वीपेक्षा आजचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यापटीने शेतमालाचे भाव वाढलेले नाही. कोणताही व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी उत्पादन खर्च कमी केला जातो. फक्त रासायनिक खते-औषधांचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी न होता तो वाढतच जाणार. आणि अशी शेती फायद्यात येणे जवळजवळ अशक्यच. याशिवाय रासायनिक खते-औषधांची किंमतही खूप जास्त असते. या उलट सेंद्रिय खते-औषधाची किंमत ही स्वस्त असते.

        या सर्व कारणांमुळे रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या वापराची शेती पद्धती आपणांस बदलणे अपरिहार्य आहे. कितीही दुष्परिणाम असले तरी कोणतेही सरकार नोटबंदीप्रमाणे रासायनिक खते-औषधांवर बंदी आणू शकत नाही. यासाठी एकच पर्याय राहतो तो म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल जनजागृती करणे. ही जनजागृती या घडीला बऱ्यापैकी झालेली आहे. आता आहे ती म्हणजे नेमकी सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी करावी आणि पीक काढणी पर्यंत काय काय पद्धत वापरावी याची.

 

८) प्रकल्प निष्कर्ष - evs project 


१) सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांबाबत तुलनात्मक अभ्यास करता आला:

        या प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या दोन्ही शेती पद्धतींचा सखोल तुलनात्मक अभ्यास करता आला. दोन्ही पद्धतींमध्ये वापरली जाणारी खते, औषधे, उत्पादन प्रक्रिया, खर्च आणि पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास केल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीतील मूलभूत फरक स्पष्टपणे समजून आला.

२) आजच्या काळातील सेंद्रिय शेतीचे महत्त्व जाणून घेतले

        आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधिक वाढलेले आहे हे या अभ्यासातून स्पष्ट झाले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि मानवी आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, हे लक्षात आले.

३) सेंद्रिय खतांचे प्रकार आणि त्यांचे होणारे परिणाम याबाबत माहिती घेतली

        या प्रकल्पाद्वारे शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खत, माशांचे खत यांसारख्या विविध सेंद्रिय खतांचे प्रकार समजून घेता आले. तसेच या खतांचा जमिनीच्या पोतावर, पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर आणि पिकांच्या गुणवत्तेवर होणारा सकारात्मक परिणाम अभ्यासता आला.

४) रासायनिक शेतीबाबत अधिक माहिती जाणून घेतली

        रासायनिक शेती का स्वीकारली गेली, उत्पादन वाढीसाठी तिचा कसा वापर केला जातो आणि आधुनिक शेतीमध्ये तिचे स्थान काय आहे याबाबत सविस्तर माहिती मिळाली. रासायनिक शेती ही तात्पुरत्या उत्पादनवाढीसाठी उपयुक्त असली तरी तिचे दुष्परिणाम गंभीर असल्याचे लक्षात आले.

५) रासायनिक खतांचे प्रकार आणि त्यांचे होणारे परिणाम याबाबत माहिती मिळाली

        नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खते यांचे प्रकार, त्यांचा वापर आणि जमिनीच्या सामूवर, पाण्यावर व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून घेता आले.

६) सेंद्रिय आणि रासायनिक शेती यांमधील फरक समजून घेतला

    या अभ्यासातून सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक, आरोग्यास सुरक्षित व दीर्घकालीन फायदेशीर असल्याचे, तर रासायनिक शेती ही तात्पुरत्या फायद्यासाठी घातक ठरू शकते हे स्पष्ट झाले.

 

९) प्रकल्प संदर्भ - पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प 

  • www.wikipidia.org
  • www.educationalmarathi.com
  • पर्यावरण पुस्तिका


प्रकल्प अहवाल, प्रकल्प सेमिनार आणि प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी फोटो स्टीकर खालील PDF मध्ये देण्यात आले आहेत.

 

***********


📘 या प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!

खाली दिलेली PDF डाउनलोड करा आणि मिळवा EXTRA खास सामग्री — जी तुमचा प्रकल्प अधिक आकर्षक आणि पूर्ण बनवेल 🌼

क्रमांक
PDF मध्ये समाविष्ट माहिती
1️⃣
संपूर्ण तयार प्रकल्प (PDF फाईल)
2️⃣
सेमिनारसाठी तयार भाषण / प्रस्तुती
3️⃣
संपूर्ण प्रकल्प अहवाल
4️⃣
प्रकल्पामध्ये लावण्यासाठी READY TO PRINT सुंदर छायाचित्रे
5️⃣
“निरीक्षण” या मुद्द्यासाठी आवश्यक सविस्तर माहिती दिली आहे

📥 आता लगेच डाउनलोड करा आणि तुमचा प्रकल्प बनवा १००% परिपूर्ण आणि प्रभावी!

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.