अनौपचारिक पत्रलेखन
![]() |
अनौपचारिक पत्रलेखन | Anoupacharik patralekhan |
मित्रांनो तुमचे Educationalमराठी या
आमच्या वेबसाईट वर स्वागत आहे. या आधी आपण अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ? आणि
परीक्षेमध्ये अनौपचारिक पत्रलेखन कसे करावे याबाबत माहिती आपण या आधीच्या लेखा
मध्ये घेतली आहे. जर ती post पहिली नसेल तर त्याची link खाली दिली आहे. आज आपण या post मध्ये अनौपचारिक पत्रलेखनाचा नमुना पाहणार आहोत; ज्याच्या आधाराने तुम्हाला कल्पना
येईल की औपचारिक पत्रलेखन कसे करावे .याचा उपयोग परीक्षांमध्ये होईल. चला तर मग
सुरु करूयात आजच्या विषयाला .......
(सूचना : सदर post पाहताना जर तुम्ही MOBILE वापरत असाल तर MOBILE TILT (आडवा)करून पहावी.)
प्रश्न : आपल्या लहान भावास / बहिणीस नियमित अभ्यास करण्याचे महत्व पटऊन देणारे पत्र थोडक्यात लिहा.
उत्तर :
विसावा वसतिगृह,
एजुकेशनल मराठी विद्यालय,
रत्नागिरी – ४१५ ६१२
दिनांक : ३ नोव्हेंबर २०२०
चिरंजीव राज यास,
अनेक आशीर्वाद.
कालच मला बाबांचे पत्र मिळाले. पत्रामध्ये तुझी तक्रार वाचून
मला खूप वाईट वाटले. बाबांनी पत्रात लिहिले आहे की, तू सध्या नित अभ्यास करत
नाहीस, त्यामुळे तू अभ्यासात मागे पडत आहे. पहिल्या सत्र परीक्षेमध्ये तुझी
टक्केवारी खूप कमी झाली आहे. राज , ही बाब अत्यंत खेदाची आहे. खर पाहता यापूर्वी
तू वर्गामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये यायचास . पण यावर्षी तू सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे
दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पहिल्या चाचणीमध्ये तुला कमी गुण मिळाले होते तेव्हाच
तुला मी अभ्यास करायला सांगितले होते. पण त्यावेळी तू म्हणाला होतास, “या चाचणीला
विशेष महत्व नाही. मी यापुढे खूप अभ्यास करेन.” पण या
सुट्टीत तू अभ्यास करायचे सोडून खेळण्यात जास्त लक्ष दिलेस असे आत्ता वाटत आहे.
राज सुट्टी ही मौज करण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी असते हे
मला मान्य आहे, पण दिवसातून दोन-तीन तास
तरी अभ्यास करायला हवा. त्यामुळे आपल्या अभ्यासाची सवय नष्ट होत नाही.
राज अजूनही तुला आपल्या अभ्यासाच्या पद्धतीत सुधारणा
घडवण्याची सन्धिआहे. पुढच्या वर्षी तुला शहरातील शाळेत दाखल व्हायचे आहे ना ? मग
हे चार महिने नियमित अभ्यास कर. नियमित अभ्यास केल्याने अभ्यासाचे ओझे वाटत नाही.
मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास सुरुवात केल्याचे मला
पत्राने कळव. मी वाट पाहत आहे. आईबाबांना शीरसाष्टांग नमस्कार.
तुझा
अ.ब.क.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
- तुम्हाला औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ? आणि कसे करावे ? या बाबत माहिती घ्यायची असल्यास खालील link वर click करा
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
·
मित्रांनो आज आपण अनौपचारिक पत्रलेखनाचा नमुना पहिला.
तुम्हाला आजची महती आवडल्यास आम्हाला comment करून नक्की सांगा.
· तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध किंवा कोणत्याही विषयावरील पत्रलेखन हवे असल्यास आम्हाला comment मध्ये किंवा contact form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा नक्की प्रयत्न करू.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
धन्यवाद