BUY PROJECT PDF Click Here!

नद्यांची घुसमट | Nadyanchi ghusmat

नद्यांची घुसमट | Nadyanchi ghusmat free essay pdf file downlod free pdf file downlod
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

नद्यांची घुसमट


नद्यांची घुसमट | Nadyanchi ghusmat

नद्यांची घुसमट | Nadyanchi ghusmat 



➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

        मी या उन्हाळाच्या सुट्टीमध्ये शहरात राहणाऱ्या माझ्या मामाच्या घरी गेलो होतो. तेव्हा माझ्या मामाने मला हौसेने शहरदर्शन घडवले. एके दिवशी सायंकाळी त्या शहरातला एक पुरातन किल्ला पाहायला चाललो होतो. मधेच एका ठिकाणी दुर्गंधीचा प्रचंड वास आला. पाहतो, तर त्या रस्त्याच्या कडेन एक गार वाहत होते. आमची गाडी रस्त्याने पुढे-पुढे सरकत होती आणि मला त्या गटाराचे गलिच्छ दर्शन घडत होते. कुजलेले अन्न पदार्थ, शेण, मलमूत्र, सांडपाणी, फळे , पालापाचोळा वाहत होता. प्लास्टिक, कागद, तुटक्या चप्पल, यांसारख्या विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू त्या पाण्यातून वाहत चालल्या होत्या. गटाराच्या भिंतींमधून आजूबाजूच्या इमारतींचे सांडपाण्याचे पाईप  येथे जागोजागी दिसून येत होते. त्यातून या गटारामध्ये सांडपाणी धो-धो वाहून येत होते. गटाराच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यातील शौचालयांची घाण याच गटारात पडत होती. आसपासच्या कारखान्यातील दुषित पाणी या गटारात सोडलेले होते. अत्यंत गलिच्छ आणि किळसवाणे दृश्य होते ते! मला तर तिकडे पहावेनाच!

गुरु एक कल्पतरू.

           मला अगदी किळसच आली. आणि मी ती तोंडन व्यक्त ही केली. तेव्हा मामाने मला तिथल्या त्या गटाराची सारी जन्मकथाच सांगितली. ते गटार नव्हतेच मुळी ! खरे तर ती त्या शहराची नदी. ५०-६० वर्षांपूर्वी स्वच्छ, निर्मळ व सुंदर पाणी सर्वाना पुरवणारी नदी होती. संपूर्ण काठावर डौलदार झाडे होती.नदी किनारी विहार करणे  हा तेव्हा तिथे राहणाऱ्या लोकांचा नित्यक्रम झाला होता. नदीसुद्धा आपले रूप आपल्याच पाण्यात न्याहाळत असे. नंतर या सुखाला दृष्ट लागली आणि त्या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले. त्यातच मानवी अतिक्रमणांमुळे नदीचे पत्रा सुद्धा आकसत गेले. चहुबाजूंनी तिची घुसमट सुरु झाली तेव्हापासून ही नदी स्वताच्या सुंदर आणि निखळ पाण्यासाठी तडफडत आहे. पण माणूस तिचे क्रूरपणाने नाकतोंड दाबत आहे. या घुसमटीमुळे पावसाळ्यात तर कहरच होतो.  पावसाळ्यात ही नदी ओसंडून वाहते. पाण्याबारोवर स्वताच्या पात्रातील सर्व घाण सर्व शहरभर पसरवते. साथीचे रोग पसरतात.नाना प्रकारचे आजार शहरामध्ये निर्माण होतात. यामध्ये अनेक नागरिक आपले प्राण गमावतात. सर्वत्र हाहाकार माजतो.

प्रयत्न हाच परमेश्वर.

        भारतामध्ये सध्या सर्वत्र हेच चित्र पाहायला मिळते. काही ठिकाणी तर नद्या आटून गेल्या आहेत किंवा काही ठिकाणी त्या नद्यांची गटारे झाली आहेत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तर या नद्यांची पुरती वाट लागली आहे.एकेका दिवशी लाखो भाविक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकत्र जमतात. त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी शासनाने कोणत्याही त्या ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे काही वेळेला ही ठिकाणे मलमुत्रांचे आगार बनतात. हे सर्व त्या नदीला सोसावे लागते. या नद्यांना तर चहूबाजूंनी प्रदूषणाचा वेढा पडलाय.

वेळेचे महत्व

        नद्यांची घुसमट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे दोनतीनशे वर्षांपूर्वीपर्यंत माणूस आणि नद्या एकमेकांशी जुळवून घेत असत , एकमेकांना अडथला न निर्माण करता आपापले जीवन जगत असत.पण इंग्रजांचे आगमन झाले आणि सारी परिथिती पालटली . इंग्लंड-युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे उद्योगांची लाट आली होती. त्यामुळे प्रचंड प्रमाणवर कच्च्या मालाची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी कच्च्य अमलाच्या निर्मितीला उत्तेजन द्यायला सुरुवात केली. नद्यांवर मोठमोठी धरणे बांधण्यात आली आणि कृत्रिमरीत्या पाणी साठवून  त्याचा पुरवठा सुरु केला गेला. यातून नद्यांचे शोषण सुरु झाले. नद्या आटू लागल्या. उन्हाळ्यात त्या कोरड्या पडू लागल्या. त्यामुळे आसपासच्या विहिरी आटू लागल्या . उन्हाळ्यामध्ये त्या कोरड्या खाक  पडू लागल्या. धनदांडगे व टगे स्वताच्या शेतासाठी , पिकांसाठी पाणी पळवू लागले. लोकांना शेतीसाठी सोडाच पण ; पिण्यासाठी सुद्धा पणी अपुरे पडू लागले.

भ्रष्टाचार - समाजाला लागलेली कीड 

        अशा परिस्थितीमध्ये भीषण आर्थिक आणि सामाजिक परिणाम घडून येऊ लागले. धरणांतील पाणी शहरासाठी वापरले जाऊ लागले. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर पाण्य्साठी वणवण भटकण्याची वेळ आली. लोकांचा शहराकडे जाण्याच्या कल वाढू लागला. शहरांमध्ये लोकसंख्या वाढू लागली त्याचबरोबर झोपडपट्ट्या वाढू लागल्या. गुन्हेगारी फोफावली. नद्यांच्या शोषणामुळे समाजाचेही शोषण सुरु झाले. यावर तत्परतेने उपाययोजना किली नाही, तर अवध समाजच रसातला जाईल व शहरातील काही नद्यांची गटारगंगा होईल.


        समाजाला वाचवायचे असेल, माणसाला वाचवायचे असेल , तर नद्यांचे होत असलेले शोषण ताबडतोब थांबवले पाहिजे.नद्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील हे आधी जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र तात्पुरती मलमपट्टी करणारे उपाय योजता कामा नयेत. आपल्या देशाचा, तसाच आपल्या जागेच्या जमिनीचा एक नकाशा असतो. त्याच प्रमाणे पाण्याचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठी एक नकाशा बनवणे गरजेचे आहे. की ज्यामध्ये उपलब्ध पाणीसाठी, विहिरी, तलाव, पावसाचे प्रमाण, एखाद्या प्रदेशातली नद्यांची संख्या आणि त्यांची पाणी पुरवण्याची क्षमता यांसारख्या बाबींचा आधार घेऊन पाण्याची उपलब्धता कोठे आहे आणि उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे कसा वापर करता येईल याचा आराखडा बनवला पाहिजे.

वैचारिक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?

        एकदा आराखड्याच्या मदतीने विविध भागांतील पाण्याची गरज लक्षात आली की, पाणी पुरवठ्याच्या योजना आखता येतील. मोठ मोठ्या धरणांऐवजी लहान लहान बंधारे बांधून पाणी अडवले पाहिजे. पूर आल्यानंतर गावेच्या गावे बुडवणाऱ्या गंगा यमुना या मोठ्या नद्यांचे पाणी कालव्यांच्या सहाय्याने जिथे उसासारखी अमाप पाणी लागणारी पिके घेतली जातात अशा प्रदेशांना दिले पाहिजे. ठिबक सिंचनासारख्या पद्धतींमुळे पाण्याचा होणारा अपव्यय टळेल. भारतीय संकृतीमध्ये नद्यांना माता असे संबोधले आहे. या मतांचा आपण प्रेमाने सांभाळ केला, तर या माता त्याच्या कुशीत मानवी जीवन आनंदाने फुलवतील.


➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:  

        गटारांचे दर्शन - नदीला आलेले गटाराचे स्वरूप - सर्वच नद्यांची घुसमट - नद्यांना प्रदूषणाचा वेढा - इंग्रजांच्या काळामध्ये नद्यांचे शोषण सुरु झाले - नद्यांच्या शोषणामुळे समाजजीवनाचे शोषण - माणसाला वाचवण्यासाठी नद्यांचे शोषण थांबवणे आवश्यक - पाणी वितरणाचा आराखडा बनवणे - गरजेनुसार पाणी पुरवठा करणे - लहान बंधारे आणि नद्याजोड प्रकल्प - मानवी जीवन सुखी करण्याचा मार्ग ]

 

 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 Nadaynchi ghusamat essay in marathi language
Nadyanchi honari gusamat nibandh in marathi
नद्यांची घुसमट मराठी निबंध pdf fil

 

 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • नद्यांची होत असलेली घुसमट या विषयावरील तुमचे विचार  आम्हाला  नक्की COMMENT द्वारे कळवा.

 



 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

 

 Free Pdf file download

या निबंधाची Pdf file download करण्यासाठी खालील link वर click करा.

नद्यांची घुसमट निबंध pdf file downlod

 

 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤

 

धन्यवाद 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.