BUY PROJECT PDF Click Here!

मी रस्ता बोलतोय | Mi rasta boltoy

मी रस्ता बोलतोय | Mi rasta boltoy free pdf file download.
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

मी रस्ता बोलतोय 

मी रस्ता बोलतोय  | Mi rasta boltoy

मी रस्ता बोलतोय  | Mi rasta boltoy 


➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


        मित्रांनो, आज मला तुम्हाला काहीतर्री सांगायचे आहे. खूप दिवस मनात कोंडून ठेवले होते पण आत्ता मला तुम्हाला सांगावेच लागेल माझ्या अंगावर या पावसाळ्यात असंख्य खड्डे पडले आहेत. या सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसते. अपघातांच्या मालिका पाहायला मिळतात आणि तुमच्या या गैरव्यवस्थेला मला जबाबदार धरता. माझ्या नावाने ओरडत बसता. हे ऐकून  मला किती यातना होत आहेत! एकदा स्वतःला प्रश्न विचारून बघा, तुमच्या या गैरव्यस्थेला मी जबाबदार आहे का?

सैनिकाची आत्मकथा

        मित्रांनो तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये डोकावून पाहिलात तर मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून मी तुमची सोबत करत आलो आहे. आदिमानवाची जेव्हा केव्हा उत्पत्ती झाली. तेव्हाच माझा जन्म झाला. माणूस अधिकाधिक प्रमाणावर भ्रमण करू लागला आणि माझा विस्तार अधात गेला. म्हणूनच रस्ता म्हणजे प्रवास! रस्ता म्हणजे प्रगती ! अशा प्रकारच्या व्याख्या तुम्हीच तर तयार केल्या आहेत. आजवरच्या मानवाच्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे.

शेतकऱ्याची आत्मकथा.

        मानवाच्या उत्पत्तीनंतर त्याचे सुरुवातीचे जीवन कष्टमय होते. म्हणून त्यावेळी माझे रूपही ओबडधोबड आणि खडकाळ होते. माझा देह हा काट्याकुट्यांनी भरलेला होता. ठेचकाळत, खरचटत, काटे भरून रक्तबंबाळ झालेले पाय घेऊन माणसाला त्य्कॅह्ची पुढची वाटचाल करावी लागत असे. त्यातच जंगली श्वापदे केव्हा माणसावर आक्रमण करतील याचा काही नेम नसायचा. माणूस आपला मार्ग भरकटू नये, कोणत्याही संकटामध्ये सापडू नये यासाठी मलाच काळजी घ्यावी लागायची मी त्याला योग्य दिशेने घेऊन जाऊ लागलो. किंबहुना, तेच माझे जीवितकार्य आहे. मी माणसाला त्याच्या इच्छित स्थळी पोहचवतो. आपल्या इच्छित स्थळी पोहचल्यावर माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो. तो पाहून आपण केलेल्या कामाचे सार्थक झाल्याचे वाटते. माणसाच्या सुखाच्या वाटेवरचा  मी सोबती आहे. त्याच्या जीवनातील घडलेल्या प्रत्येक घटनांचा मी साक्षीदार आहे. माझ्या शिवाय आत्ता मानवी जीवन अशक्यच आहे.

पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध)

        मित्रांनो, माणसाबरोबर मी सुद्धा खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत. आत्ता ज्याप्रमाणे माझे रूप ऐसपैस, रुंद गुळगुळीत दिसते. तसे ते सुरुवातीच्या काळामध्ये नव्हते. सुरुवातीच्या काळामध्ये साधी पौल्वत हे माझे रूप होते. माणसाला चाकाचा शोध लागल्यानंतर त्याने बैलगाडीचा वापर सुरु केला तेव्हा मीच स्वतःला थोडेसे रुंद केले. काही वर्षांनी मोटार गाडीचा शोध लागल तेव्हा माझ्यावर असणारे दगड धोंडे काढून टाकणे भाग पडले. माझ्यावरचे खड्डे भरण्यात आले. अशा रीतीने कच्च्या रस्त्यच्या स्वरुपात मी तुमच्या सेवेसाठी हजार झालो. त्यावेळेला माझ्या वरून एखदी मोटार भुरकन गेली तरीही धुळीचे लोट उसळायचे . मात्र माणसाने त्याच्या जीवनामध्ये जशीजशी प्रगती केली तसतसे माझे रुप्सुद्द्ध बदलत गेले. मी डांबरी, कॉंक्रीट रस्त्यःचे रूप घेतले यानंतर तर माझ्या रुपामध्ये सापत्याच्ने बदल होत फेले. एकपदरी, दुपदरी, चौपदरी, महामार्ग इत्यादी अनेक रूपे मी धारण केली आणि आत्ता तर 'एक्प्रेस हायवे' हे अत्यंत अद्वितीय रूप मला मिळाले आहे.

आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थाचे मनोगत

        खर सांगायचे तर काही जणांना हे मार्ग म्हणजे धोपटमार्ग वाटतात. त्यांना आडवळणाने जाण्यातच प्रवासाचा आनंद मिळतो. डोंगरदऱ्या धुंडाळणाऱ्या गिर्यारोहकांना किवा कोलंबस, स्कॉट, वास्को-द-गामा यांसारख्या धाडशी प्रवाशांनाही मी आनंदाने मदत केली आहे. माझ्यामुळेच माणसाला नवनवीन प्रदेशांचा शोध लागला आहे. मानवाच्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे. संपूर्ण मानवी प्रगतीचा खराखुरा इतिहास फक्त मीच लिहू शकेन!

मराठी भाषेची कैफियत

        मी तुमच्यासाठी आपल्या देशासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. दिवसभर तुम्हाला एका जागेवरून दुसरीकडे पोहचवत असतो. सकाळ झाल्यावर शेतकर्यांना त्यःच्या शेताकडे घेऊन जातो. कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या दिशेने घेऊन जातो. मी नसतो देश प्रगतीकडे गेला असता काय?


        असे राबताना मित्रानो मला जरासुद्धा उसंतच मिळत नाही.रात्रीच्या  वेळी सारे शांत होते तेव्हा. काही क्षण डोळ्याला डोळा लागतो न लागतो तोच एखादे वाहन येते आणि मला खडबडून जाग येते. त्या वाहनाला त्याच्या इच्छित ठिकाणी पोहचवतो पुन्हा जरा  लवंडतो. तोच उशीर झालेला असतो. एखादा वाटसरू आपल्या बायाकोमुलाच्या ओढीने लगबगीने येतो. रात्रीच्या मिट्ट कालोखामध्ये त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. पण मी त्याल धीर देत त्याची सोबत करतो आणि त्याला त्याच्या घरापर्यंत सुखरूप पोहचवतो. लक्षात ठेवा मी नसेन तर तुम्हाला तुमची प्रगती करता येणार नाही. मिई नसेन तर तुमचे जीवन अशक्य आहे.

 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:  

        मानवी जीवनाच्या उत्पत्तीपासून मानवाची साथ – प्रारंभीचे स्वरूप ओबडधोबड, खडकाळ, असुरक्षित – माणसाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे कार्य – विविध रूपे धारण – काही जणांना वळणा वळणाच्या रस्त्यांची हौस – माझ्यामुळे नवनवीन प्रदेशांचा शोध – ज्यांच्याकडे धाडस त्यांना तितक्याच धैर्याने सोबत – इच्छित स्थळी पोहचवतो – माझ्या शिवाय मानवी जीवन अशक्य .]


 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 रस्त्याची आत्मकथा 
सडक की आत्मकथा इन मराठी
रस्त्याचे मनोगत 
रस्त्याची व्यथा मराठी निबंध 

मी रस्ता बोलतोय मराठी आत्मकथा 
मी रस्ता बोलतोय मराठी निबंध आत्मकथन 
मी रस्ता बोलतोय निबंध लेखन मराठी 


 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • मी रस्ता बोलतोय या विषयावर रस्त्याची आत्मकथा तुमच्या शब्दात लिहून आम्हाला  नक्की COMMENT द्वारे कळवा.



 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


 Free Pdf file download

या निबंधाची Pdf file download करण्यासाठी खालील link वर click करा.

मी रस्ता बोलतोय निबंध pdf file download


 ➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


धन्यवाद 

 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.