बातमी लेखन नमुना | News writing in marathi language |Outline for a easy news writing in Marathi

बातमी लेखन नमुना | News writing in एखाद्या सांकृतिक प्रसंगावर आधारित बातमी तयार करा. language एखाद्या सभेला उपस्थित राहून सभेवर आधारित बातमी तयार करा.
Admin

 

बातमी लेखन नमुना 



बातमी लेखन नमुना | News writing in marathi language

बातमी लेखन नमुना | News writing in marathi language 



📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


१)एखाद्या सभेला उपस्थित राहून सभेवर आधारित बातमी तयार करा.

उत्तर :

देणाऱ्याने  देत जावे !


        रायगड,दि. १८ जुन २०१९ : केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून गुणवान विद्यार्थांचा उच्चशिक्षणाचा मार्ग बंद होणे. ही गोस्थ आप;याच समाजासाठी लाजिरवाणी आहे. म्हणून गुणवान विद्यार्थांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उच्च शिकाष्ण घेता यावे, म्हणून आपण सर्वानीच मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन रायगडमधील, कोळीसरे गावाचे प्रसिद्ध वक्ते विष्णुदास शास्त्री यांनी सभेत केले.


        कोळीसरे गावामधील यश राठोड ( ९३%) व कलावती वालकुंद्रे ( ९१%) यांनी शालांत परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची आहे. दोफ्हांचेही आईवडील मोलमजुरीची कामे करून कशीबशी आपल्या पोटाची खळगी भारतात. अशा परीस्ठीतीमध्ये त्या गुणवान विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय ‘कोळीसरे गाव संस्थानाने’ घेतला . या संघातर्फे परीसाराथिल विविध क्षेतन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांच्या सत्कारासाठी सभा आयोजित केली गेली होती. त्या सभ्त विष्णुदास शास्त्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संघाचे सचिव विठोबाजी राठोड यांनी मदतनिधी कसा उभारणार व त्याचा विनियोग कसा करणार याची याची माहिती सर्वाना दिली. अध्यक्षीय भाषणाने या सभेची सांगता झाली.

 

📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


२) एखाद्या सांकृतिक प्रसंगावर आधारित बातमी तयार करा.

उत्तर :


‘फुगडी माझी गाजली गं’ रत्नागिरीच्या

कलांगण नाट्यगृहात’


        रत्नागिरी, दि. २६ डिसेंबर : ‘फुगडी’ हा नृत्यक्रीडाप्रकार नामशेष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा एक सरस, बहारदार फुगड्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी झोकात सादर केल्या आणि तुडुंब भरलेल्या कलांगण नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.


        विद्यार्थाच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रत्नागिरीच्या नृत्याविष्कार कला अकादमी च्या वतीने जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला जिल्याभारातील महाविद्यालयांतून तुफान प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेची अंतिम फेरी आज कलांगण नाट्यगृहात पार पडली. या अंतिम फेरीमध्ये फुगड्यांचे सर्व प्रकार सादर केले गेले. विशेष म्हणजे मुलीनी कसून मेहनत घेतली होती, हे फुगड्यांच्या सफाईदार सदरीकार्णावरून सहज लक्षात येत होते. या स्पर्धेचा निकाल सर्व स्पर्धांच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.

 

📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


३) तुमच्या महाविद्यालयात ‘अंधश्रध्दा निर्मूलन’ या विषयावर झालेल्या व्याख्यानाचा वृतांत वर्तमानपत्रात प्रसिद्धीस देण्यासाठी तयार करा.

उत्तर:


अंधश्रद्धा निर्मूलन : काळाची गरज


        रत्नागिरी,दि. २४  डिसेंबर : भारती महाविद्यालयात दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी विज्ञाननिष्ठ प्राध्यापक सुनिल चव्हाण यांचे व्याख्यान झाले. अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे, या मुद्द्ध्याचा त्यांनी सखोल उहापोह केला. लोकांच्या बऱ्याचश्या समजुती या गैरसमजावर आधारित असतात, तर काही ठिकाणी समाजकंटक लोकांकडून फसवणूकही केली जाते, असे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.  एकविसाव्या शतकात आत्ता वैद्यानिक दृष्टीकोन अंगीकारणे अत्यंत गरजेचे असून भारतीय समाजाची मानसिकता बदलायला हवी, असे त्यांनी आग्रहाने सांगितले. प्रा.सुनिल चव्हाणांच्या व्याख्यानापूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांनी जादूचे प्रयोग करून दाखवले आणि जादूटोणा करणारे व बुवाबाजी करणारे लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा कसा घेतात, ते सप्रमाण दाखवले. रुरुवातीला प्राचार्य श्री.माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी-प्रतिनिधी शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि प्रकले यांनी आभार मानले. व्य्ख्यानाला विद्यार्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणवर होती. व्याख्यानंतर पाहुण्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली.


बातमी लेखन कसे करावे त्यात कोणते मुद्दे असावेत हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ?


बातमी लेखनाचे अजून काही नमुने पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत | महाविद्यालयात रेड रिबिन  क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत

प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन | वृक्षारोपण वृतांत लेखन | स्पर्धेचे वृतांत लेखन

 वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ?


📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


ही माहिती तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

बातमीलेखन मराठीमध्ये 

बातमी तयार करणे 
बातमी लेखन कसे लिहायचे 
वृत्तलेखन कसे करावे.
Batami lekhan kase karave 
Batami lekhan in marathi
Batami lekhan marathi 12th class

Outline for a easy news writing in Marathi

 

📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


  • बातमीलेखन/ वृत्आतलेखन याबाबत आम्ही दिलेली माहित आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध तसेच बातामिलेखानाचा नमुना हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 

 

📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄

धन्यवाद 



3 comments

  1. Unknown
    Unknown
    गुरू पोणिमा‌साजरीशाळेत
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
  2. Unknown
    Unknown
    तुमच्या गावात झालेल्या स्वच्छता अभियानाची बातमी लिहा.
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.