BUY PROJECT PDF Click Here!

गांडूळ खत प्रकल्प ११वी १२वी | Gandul khat prakalp 11vi 12vi

Gandul khat prakalp in Marathi | Gandulkhat project in Marathi pdf free download | Gandul khat project in Marathi | Gandul khat project in Marathi pdf
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

गांडूळ खत प्रकल्प माहिती | Gandul khat prakalp Marathi 

Gandul khat prakalp in Marathi | Gandulkhat project in Marathi pdf free download | Gandul khat project in Marathi | Gandul khat project in Marathi pdf free download book

Gandul khat prakalp in Marathi Gandulkhat project in Marathi pdf free download Gandul khat project in Marathi Gandul khat project in Marathi pdf free download book Gandul khat prakalp prastawana Gandul khat prakalp nirikshane Gandul khat prakalp vishleshan गांडूळ खत प्रकल्प सविस्तर माहिती गांडूळ खत प्रकल्प प्रस्तावना गांडूळ खत प्रकल्प निरीक्षणे गांडूळ खत प्रकल्प विश्लेषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी गांडूळ खत प्रकल्प निष्कर्ष


प्रकल्प प्रस्तावना/ प्रकल्प विषय निवड


देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसू लागला आहे. दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या नापिक झाल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.

मोठ्या प्रमाणवर उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. वर्षांनुवर्षे  एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

गांडूळ खातासारख्या नैसर्गिक खताचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होईल आणि जमिनीचा पोत देखील सुधारण्यास मदत होईल. गांडूळ खत हे कमी खर्चात तयार होते त्यामुळे शेतकऱ्या खतासाठी अतिरिक्त खर्च कमी होईल आणि त्याचबरोबर रसायन विरहित शेती करणे शक्य होईल.


प्रकल्प अनुक्रमणिका

अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

२)

विषयाचे महत्व

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

 

४)

निरीक्षणे

 

५)

विश्लेषण

 

६))

निष्कर्ष

 

७)

संदर्भ

 













प्रकल्प उद्दिष्ट्ये

Ø गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती जाणून घेणे.

Ø गांडूळ खताचे फायदे कोणकोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.

Ø गांडूळ खत तयार करण्याच्या विविध पद्धतींबाबत अधिक माहिती जाणून घेणे.

Ø गांडूळ खत आणि कंपोस्ट खत यांमधील फरक जाणून घेणे.

Ø गांडूळ खत तयार करताना कोण कोणत्या प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे याबाबत माहिती मिळविणे.

Ø गांडूळ खत तयार करताना वापरण्यात येणाऱ्या प्रजातींचा अभ्यास करणे.

Ø गांडूळ खताचे महत्व सर्वाना पटवून देणे.

गांडूळ खत प्रकल्प सविस्तर माहिती | गांडूळ खत प्रकल्प प्रस्तावना | गांडूळ खत प्रकल्प निरीक्षणे | गांडूळ खत प्रकल्प विश्लेषण | पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | गांडूळ खत प्रकल्प निष्कर्ष 

प्रकल्प विषयाचे महत्व

 

आज आपण २१व्या शतकात जगत आहोत . दिवसेंदिवस भरमसाठ वाढत जाणारी लोकसंख्या आणि कमी कमी होत जाणारे अन्न धान्याचे उत्पन्न ही साऱ्या जगासमोर एक समस्याच बनत चालली आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी रासायनिक शेतीच्या दिशेन वळताना दिसत आहेत. त्यामुळे अधिक उत्पन्न घेणे सहज शक्य होते. हे जरी खरे असले तरीही रासायनिक शेतीमुळे माणसाला आणि धरणीमातेला मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम भोगावे लागतात.

वाढत चालेलला रसायनांचा वापर आणि कमी कमी होत चाललेली अन्नधान्याची गुणवत्ता, माणसाच्या आरोग्यावर होणारे परिणाम, निसर्गावर होणारे विपरीत परिणाम या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला तर, आज गांडूळ खतासारखा नैसर्गिक खताचा पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. गांडूळ खताचा वापर करून भरमसाठ उत्पन्न मिळणे शक्य नसले तरीही चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन घेणे सहज शक्य आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आज गांडूळ खत निर्मिती करून त्या खताचा वापर शेतीसाठी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पर्यावरणाच्या आणि शेतीच्या दृष्टीने विचार केला तर गांडूळ खत निर्मिती हा प्रकल्प विषय अधिक महत्वाचा आहे.

Gandul khat prakalp in Marathi | Gandulkhat project in Marathi pdf free download | Gandul khat project in Marathi | Gandul khat project in Marathi pdf free download book

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती

 

‘गांडूळ खत निर्मिती’ हा प्रकल्प करीत असताना मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा उपयोग केला तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून प्रकल्पाची माहिती संकलित केली.

या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील पाण्याच्या प्रणालीबाबत प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. अधिक माहिती मिळविण्यासाठी जलसुरक्षा   विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या  मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

 

सर्वेक्षण प्रश्नावली

सर्वेक्षण ठिकाण: .........................................

नमुना : परिसरातील ५ व्यक्तींना विचारलेली प्रश्नावली.

गांडूळ खत निर्मिती या प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण या कार्यपद्धतिचा अवलंब केला आहे. परिसरात असणाऱ्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पांना भेटी देऊन गांडूळ खत निर्मितीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.

सर्वेक्षणाची प्रश्नावली.

१)   गांडूळ खत निर्मिती तुम्ही कधी पासून करीत आहात.

२)   गांडूळ खत शेतीसाठी कशाप्रकारे पूरक ठरते?

३)   गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी तुम्ही गांडूळाच्या कोणकोणत्या प्रजाती वापरता?

४)   गांडूळ खत पूर्णपणे तयार होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो.

५)   गांडूळ खत तयार होत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

६)   गांडूळ खत तयार करण्याचा पद्धती कोणकोणत्या आहेत?

७)   गांडूळ खताचे शेतीसाठी कोणकोणते फायदे होतात?

८)   गांडूळ खत निर्मितीसाठी किती खर्च अपेक्षित आहे?

९)   गांडूळ खत निर्मितीची जागा निवडताना कोणती काळजी घ्यावी?

१०)               तुम्ही इतर लोकांना  गांडूळ खत निर्मित करण्यासाठी प्रोत्साहन देता का?

 

गांडूळ खत प्रकल्प सविस्तर माहिती | गांडूळ खत प्रकल्प प्रस्तावना | गांडूळ खत प्रकल्प निरीक्षणे | गांडूळ खत प्रकल्प विश्लेषण | पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | गांडूळ खत प्रकल्प निष्कर्ष 

हे सुद्धा पहा:


·       नोबेल विजेत्या कोणत्याही २ पर्यावरणवादींची माहिती. पर्यावरण प्रकल्प
·       स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास आणि पर्यावरण प्रकल्प
·       तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके
·       शेतीसाठी वापरली जाणारी कीटक नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यावरण प्रकल्प
·       नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी



प्रकल्प  निरीक्षणे


§  गांडूळखताचे फायदे

1.     जमिनीचा पोत सुधारण्यास उपयुक्त ठरते.

2.     मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडून येतो.

3.     जमिनीचा सामू (पी.एच) पातळीत योग्य राखला जातो.

4.     गांडुळाच्या बिळांमुळे वनस्पतीच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत होते.

5.     जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

6.     जमिनीची धूप कमी होते.

7.     बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.

8.     गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.

9.     गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असते त्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य वनस्पतींना आवश्यक त्या प्रमाणात त्वरित उपलब्ध होतात.

10.   गांडूळ खताच्या वापरणे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.

11.   गांडूळ खत तयार करताना ओल्या कचऱ्याचे देखील व्यवस्थापन होते.

12.   मातीचा कस टिकून राहतो.

13.   या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात

14.   ह्या खतामुळे जमिन सुपीक राहते.


गांडूळ खत व कंपोस्ट खत  यांची तुलना

गांडूळ खत

कंपोस्ट खत

कालावधी

1-1.5 महिना

4 महिने

पोषक तत्त्व

नायट्रोजन (N)

2.5-3.0 टक्के

0.5-1.5 टक्के

फॉस्फरस (P)

1.5-2.0 टक्के

0.5-0.9 टक्के

पोटॅश (K)

1.5-2.0 टक्के

1.2-1.4 टक्के

सूक्ष्म व इतर पदार्थ

अपेक्षाकृत अधिक प्रमाणात

कमी प्रमाणात

प्रति एकर आवश्यकता

2 टन

5 टन

वातावरणा वरील

दुर्गंधी व रहित. डास व माशांचा अभाव. नियंत्रित तापमान, त्यामुळे उपयुक्त जिवाणुंची वाढ चांगली होते.

दुर्गंधी आणि प्रदूषणात वाढ. डास आणि माशांचा उपद्रव संभवतो. तसेच तापमानात अनियंत्रित वाढ होते, जेणेकरून उपयुक्त जिवाणू मर्यादित वाढतात
























प्रकल्प  विश्लेषण

 

Gandul khat project in Marathi pdf free download book | Gandul khat prakalp prastawana | Gandul khat prakalp nirikshane | Gandul khat prakalp vishleshan


1.          गांडूळ खत म्हणजे काय ?

 

 

गांडूळ हा प्राणी जमिनीत आढळतो. गांडूळ हा प्राणी जमिनीतील जैविक पदार्थ खातो. गांडूळाच्या विष्ठेतून जो अनावश्यक भाग बाहेर टाकला जातो त्यालाच  गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे असे म्हटले जाते. हे क्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळाने ग्रहण केलेल्या अन्नापैकी तो दहा एक्के इतका अन्नाचा भाग स्वतःच्या शरीरासाठी वापरतो उर्वरित नव्वद टक्के इतका भाग शहरीरातून उत्सर्जनाद्वारे बाहेर टाकतो. गांडूळा पासून तयार होणाऱ्या खतामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यावशक असणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असतात त्यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.  गांडूळ खताचा वापर शेतीसाठी केल्यास या खतामुळे वनस्पतीतील जैविक गुणधर्म वाढण्यास मदत होते. सेंद्रिय शेती पद्धतीतील गांडूळ खाते हे एक महत्वाचा घटक आहे.


 हे सुद्धा पहा:


·       जलप्रदूषण प्रकल्प
·       राष्ट्रीय स्तरावर झालेली पर्यावरणविषयक चळवळ माहिती पर्यावरण प्रकल्प
·       अपारंपरिक उर्जा वापर प्रकल्प
·       परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प
·       ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण




२. गांडूळाच्या विविध प्रकार आणि गांडूळखतासाठी उपयुक्त जाती.


१)   गांडूळाचे प्रकार

 

एपिजिकः या प्रकारातील गांडुळे ही जमिनीच्या पृष्ठभागालगतच आढळतात. या प्रकारातील गांडुळे ही आपल्या अन्नामध्ये सुमारे 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. या प्रकारातील गांडूळा चा प्रजननाचा दर हा इतर प्रकारातील गांडूळा पेक्षा जास्तच असतो.

अ‍ॅनेसिकः अ‍ॅनेसिक या प्रकारातील गांडुळे साधारणत जमिनीमध्ये सुमारे एक मीटर इतक्या खोलीपर्यंत आढळतात ही गांडुळे सेंद्रिय पदार्थ व माती खातात. या प्रकारातील गांडूळ हे मध्यम आकाराचे असते.

एण्डोजिकःएण्डोजिक या प्रकारातील गांडुळे जमिनीत तीन मीटर किंवा त्यापेक्षा ही अधिक खोलीवर आढळून येतात. ही इतर प्रकारातील गांडूळा पेक्षा लांब आकाराची असतात, यांचा रंग फिकट असून त्यांचा प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. या प्रकारातील गांडुळे बहुधा माती खातात.

या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अ‍ॅनेसिक या प्रकारातील गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही पेरिऑनिक्स, आईसेनिया फेटिडा , लॅम्पिटो व युड्रिलस या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.


Gandul khat prakalp in Marathi | Gandulkhat project in Marathi pdf free download | Gandul khat project in Marathi | Gandul khat project in Marathi pdf free download book

 

३.) गांडूळखत तयार करण्याच्या पद्धती

 

गांडूळखत हे दोन पद्धती द्वारे तयार केले जाते १) ढीग पद्धत आणि २) खड्डा पद्धत परंतु या दोन्ही पद्धतींमध्ये खत तयार करण्याच्या जागेवर कृत्रिम सावली असणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्या जागेवर छप्पर असणे आवश्यक आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेडची लांबी दोन ढिगांसाठी ४.२५ मीटर इतकी असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.00 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.00 ते 2.50 मीटर इतकी ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करण्यात यावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.

 

१)  ढीग पद्धत


 

Gandul khat prakalp in Marathi Gandulkhat project in Marathi pdf free download Gandul khat project in Marathi Gandul khat project in Marathi pdf free download book Gandul khat prakalp prastawana Gandul khat prakalp nirikshane Gandul khat prakalp vishleshan गांडूळ खत प्रकल्प सविस्तर माहिती गांडूळ खत प्रकल्प प्रस्तावना गांडूळ खत प्रकल्प निरीक्षणे गांडूळ खत प्रकल्प विश्लेषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी गांडूळ खत प्रकल्प निष्कर्ष
 Image source: agriamigo.blogspot.com



या पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.0 ते 3.0 मी. लांब आणि 90 सें.मी. रुंद या आकाराचे ढीग तयार करावेत. सुरुवातील जमीन पाणी टाकून ओली करून घेतली जाते. ढिगाच्या सर्वात खालच्या ठरत गवत, नारळाच्या काथ्या, भाताचे तूस यांसारख्या लवकर विघटन न होणाऱ्या पदार्थांचा ४ ते ५ सेमी जाड थर तयार केला जातो. त्यावर पुरेशे पाणी शिंपडून तो ओला केला जातो. यानंतर त्यावरील थरामध्ये ४ ते ५ सेमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे सोडावीत.

साधारणत: 50 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी ३,५०० ते ४०००  प्रौढ गांडुळे सोडावीत. जनावरांचे मलमूत्र, पिकांचे अवशेष शेतातील तण, धान्याचा कोंडा हिरवळीच्या झाडांची पाने, कोंबड्यांची विष्ठा, मासळीचे खत इत्यादी पदार्थांचा दुसऱ्या थरात समावेश करावा. ढीग तयार करत असताना संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जाईल त्यामध्ये ४० ते ५० टक्के पाणी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तयार केलेल्या ढिगावर गोणपाटाचे अच्छादन देऊन झारीने रोज पाणी शिंपडावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.


२) खड्डा पद्धत

 

Gandul khat prakalp in Marathi Gandulkhat project in Marathi pdf free download Gandul khat project in Marathi Gandul khat project in Marathi pdf free download book Gandul khat prakalp prastawana Gandul khat prakalp nirikshane Gandul khat prakalp vishleshan गांडूळ खत प्रकल्प सविस्तर माहिती गांडूळ खत प्रकल्प प्रस्तावना गांडूळ खत प्रकल्प निरीक्षणे गांडूळ खत प्रकल्प विश्लेषण पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी गांडूळ खत प्रकल्प निष्कर्ष
 Image source: agrowon.com


या पद्धतीमध्ये ३ मीटर लांब , २ मीटर रुंद आणि ६० सेंमी खोल असलेला सिमेंट चा खड्डा तयार करावा. ढिगाच्या सर्वात खालच्या ठरत गवत, नारळाच्या काथ्या, भाताचे तूस यांसारख्या लवकर विघटन न होणाऱ्या पदार्थांचा ४ ते ५ सेमी जाड थर तयार केला जातो. त्यावर पुरेशे पाणी शिंपडून तो ओला केला जातो. यानंतर त्यावरील थरामध्ये ४ ते ५ सेमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे सोडावीत.

साधारणत: १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी ६,५०० ते ७००० प्रौढ गांडुळे सोडावीत.त्यावरील थरामध्ये अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा ४० ते ५० सेमी इतक्या जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन . रोज त्यावर पाणी शिंपडून ओले ठेवावे.

गांडुळांच्या योग्य वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल.


३)खत तयार होण्यास लागणारा कालावधी


गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

 

 

गांडूळखत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

 

§  गांडूळखत तयार करण्यासाठी दमट व हवेशीर जागा निवडणे आवश्यक आहे.

§  शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15-20 दिवस कुजवावे.

§  खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.

§  गांडुळे सोडण्याअगोदर गांडुळाच्या वाफ्यावर 1 दिवस पाणी मारावे.

§  गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.

Gandul khat project in Marathi pdf free download book | Gandul khat prakalp prastawana | Gandul khat prakalp nirikshane | Gandul khat prakalp vishleshan

गांडूळखत वेगळे करण्याची पद्धत


जेव्हा खताचा रंग काळसर तपकिरी होईल तेव्हा खत पूर्णपणे तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यानंतर पाणी देणे बंद करावे. वरचा थर कोरडा झाल्यावर खड्ड्यातील सर्व गांडूळखत गांडूळासहित बाहेर काढावे. गांडुळखत आणि गांडुळे वेगळी करत असताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल.ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने खड्डा किंवा ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. खत वेगळे करत असताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये जेणेकरून गांडूळांना इजा पोहचणार नाही. गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते.

             

Gandul khat prakalp in Marathi Gandulkhat project in Marathi pdf free download Gandul khat project in Marathi Gandul khat project in Marathi pdf free download book  Gandul khat prakalp prastawana  Gandul khat prakalp nirikshane  Gandul khat prakalp vishleshan
image source: istockphoto

प्रकल्प निष्कर्ष 

 

ü गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती जाणून घेणे या प्रकल्पाच्या माध्यमातून शक्य झाले.

ü गांडूळ खताचे फायदे कोणकोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती मिळविली.

ü गांडूळ खत तयार करण्याच्या विविध पद्धतींबाबत अधिक माहिती जाणून घेता आली.

ü गांडूळ खत आणि कंपोस्ट खत यांमधील फरक समजावून घेतला.

ü गांडूळ खत तयार करताना कोण कोणत्या प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.

ü गांडूळ खत तयार करताना वापरण्यात येणाऱ्या प्रजातींबाबत अधिक माहिती मिळविली.

 

प्रकल्प संदर्भ 

 Ø www.educationalmarathi.com


Ø www.mazaabhyas.com


Ø पर्यावरण पुस्तिका

महत्वाचे :

या प्रकल्पाची फ्री pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील Subscribe to Unlock लिंक वर क्लिक करा. subcribe करा आणि back button press करा.

वरील pdf फाईल चा पासवर्ड मिळविण्यासाठी खालील  लिंक वर क्लिक करा आणि १२० सेकंद थांबा तुम्हांला १० character आणि  number असेलेला पासवर्ड मिळेल.

 

PDF PASSWORD 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.